Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी भाजप, मनसेला पोखरले; पनवेलमधून संजोग वाघेरेंचे बळ वाढवले

Maval Lok Sabha Constituency : मालमत्ता कर भरणे किंवा वसूल झालाच पाहिजे. मात्र तो जर दुप्पट आकारला जात असेल तर ते थांबले पाहिजे. हा कर भरण्यास सुमारे पावणे तीन लाख नागरिकांनी नकार दिला आहे. मात्र सिडको हा कर जबरदस्तीने वसूल करत आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसेतील अनेक पदाधिकारी नाराज असल्याचे समोर आले आहे. वरच्या पातळीवर भाजपची ताकद वाढत असताना काही स्थानिक पदाधिकारी सोडून जात असल्याचे दिसून येत आहे. याचा फायदा घेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी Uddhav Thackeray भाजप आणि मनसेला पनवेलमधून झटका दिला आहे. याचा फायदा मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवारी संजोग वाघेरेंना होणार आहे.

पनवेलमधील भाजपच्या चार माजी नगरसेवकांसह मनसेच्याही चार पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. 15) उद्धव ठाकरेंच्या उपस्थित ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशाने ठाकरे गटास पनवेलमध्ये मोठी ताकद मिळालेली आहे. त्याचा फायदा मावळचे उमेदवार वाघेरेंना होणार आहे. यावेळी ठाकरेंनी पनवेलमध्ये सिडकोकडून होणाऱ्या डबल करवसुलीवर सडकून टीका केली.

ठाकरे म्हणाले, मालमत्ता कर भरणे किंवा वसूल झालाच पाहिजे. मात्र तो जर दुप्पट आकारला जात असेल तर ते थांबले पाहिजे. हा कर भरण्यास सुमारे पावणे तीन लाख नागरिकांनी नकार दिला आहे. मात्र सिडको हा कर जबरदस्तीने वसूल करत आहे. सिडकोकडून सुरू असलेली ही वसुली तात्काळ थांबवावी. जुलमी पद्धतीने होणारी करवसूली थांबत नसल्याने हे मावळे आपल्या शिवसेनेत आले आहेत. त्यामुळे त्यांची ही समस्या आता आपली झाली आहे, असे म्हणत ठाकरेंनी सत्ता आल्यास सिडकोची वसुली बंद करण्याचे आश्वासन दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray
Satara loksabha News: नरेंद्र पाटलांनी वाढवला महायुतीच्या उमेदवारीचा सस्पेन्स; मतदारांच्या भेटीगाठीसाठी पायाला भिंगरी...

राज्य केंद्रातील सरकारवर नाराजी असल्यानेच भाजपचे BJP आणि त्यांच्या मित्रपक्षांचे अनेक पदाधिकारी आपल्याकडे येत आहेत. दिलेली आश्वासने पूर्ण होत नसल्यानेच त्यांच्यातील अनेक पदाधिकारी नाराज आहेत. निवडणूक आली की अशक्यप्राय अशा गोष्टींचे आश्वासने जाहीरनाम्यांच्या माध्यमातून दिली जातात. नंतर मात्र त्यांच्या घोषणा हवेत विरुन स्थानिक प्रश्न चिघळत जातात. एकीकडे डबल वसूली होत असताना पलवा सिटीला मात्र करमुक्ती केली आहे. या विषमतेविरोधात आवाज उठवला जात असून त्याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही ठाकरेंनी केला.

(Edited by Sunil Dhumal)

Uddhav Thackeray
Lok Sabha Election 2024: निवडणुकीची घोषणा होऊन महिना उलटला तरी 12 जागांचा 'जुगाड' काही केल्या जुळेना !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com