Satara loksabha News: नरेंद्र पाटलांनी वाढवला महायुतीच्या उमेदवारीचा सस्पेन्स; मतदारांच्या भेटीगाठीसाठी पायाला भिंगरी...

Loksabha Election 2024 : सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा ट्विस्ट अजूनही संपलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी ज्यांचा सिटींग खासदार त्यांचीच ती जागा हे सूत्र मांडले आहे.
Satara Loksabha Election
Satara Loksabha ElectionSarkarnama
Published on
Updated on

Satara Loksabha News : सातारा लोकसभा निवडणुकीसाठी सध्या महायुतीकडून इच्छुक असणाऱ्या कोणालाही अद्यापही ग्रीन सिग्नल देण्यात आलेला नाही. त्यामुळे सातारच्या उमेदवारीचा सस्पेन्स कायम आहे. सध्या इच्छुक असलेले नरेंद्र पाटील यांनीही मतदारांच्या भेटीगाठींसाठी पायाला भिंगरी लावली आहे. त्यांनी दोन आठवड्यापासून संपर्क दौरा वाढवून भेटीगाठींवर चांगलाच जोर दिला आहे.

महायुतीची उमेदवारी आपल्याला मिळावी यासाठी खासदार उदयनराजे भोसले, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, पुरुषोत्तम जाधव अन्य काही जणांनी प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र, सातारा लोकसभेचा उमेदवार मीच असणार असे स्पष्ट करुन खासदार भोसले यांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. असे असताना पाटील यांनीही मतदारांच्या भेटीगाठीसाठी पायाला भिंगरी लावली आहे.त्यांनी दोन आठवड्यांपासून संपर्क दौरा वाढवत भेटीगाठींवर चांगलाच जोर दिला आहे.

त्याचबरोबर त्यांनी भाजपकडून अजूनही कोणाला सुचना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे शेवटच्या टप्यांत काय होईल हे सांगता येत नाही, असे सूचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे नक्की उमेदवार कोण ? याचा सस्पेन्स आणखीच वाढला आहे.

Satara Loksabha Election
Raigad Pattern : उमेदवारांसाठी सर्वाधिक डोकेदुखीचा 'रायगड पॅटर्न'

सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा ट्विस्ट अजूनही संपलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार Ajit Pawar यांनी ज्यांचा सिटींग खासदार त्यांचीच ती जागा हे सूत्र मांडले आहे. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मिळणार की तेथे भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले हे उभे राहणार याबाबत सध्या उलटसुलट चर्चा सुरु आहेत. त्यातच खासदार भोसले यांनी उमेदवारीसाठी जोरदार लॉबिंग करुन सातारा जिल्ह्यात भेटीगाठीवर भर दिला आहे. त्यामुळे त्यांनी वातावरण निर्मितीही सुरु केली आहे.

मध्यंतरी महायुतीच्या घटक पक्षांच्या झालेल्या मेळाव्यात नरेंद्र पाटील यांनी जाहीर मेळाव्यात आपल्या भाषणातुन लोकसभा निवडणुकीसाठी मलाही संधी मिळणार आहे. मी अजूनही महाराजसाहेब अपेक्षित असल्याचे जाहीरपणे सांगतो. आमचे दिल्लीला कोणीच नाही. तुम्ही दहा वर्षे लोकसभेचे नेतृत्व केले आहे. राज्यसभेचेही तुम्ही नेतृत्व करत आहात. तुम्ही जसे दिल्लीला गेलात तसे आमचे मात्र दिल्ली कोणीही नाही. आम्ही सागर बंगला आणि भाजपचे मुंबईचे कार्यालय यांच्याच संपर्कात आहोत. मला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळ दिला. त्याव्दारे मला काय सांगायचे ते मी सांगितले आहे, असे सांगून उमेदवारीचा सस्पेन्स वाढवला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, सातारा लोकसभेचा उमेदवार मीच असणार असे स्पष्ट करुन खासदार भोसले यांनी गेल्या काही महिन्यांपासून मतदारसंघ पिंजुन काढण्यास सुरुवात केली आहे. असे असताना उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनीही मतदारांच्या भेटीगाठींसाठी पायाला भिंगरी लावली आहे. त्यांनी दोन आठवड्यापासुन संपर्क दौरा करुन भेटीगाठींवर जोर दिला आहे. त्यांना अजुनही उमेदवारी मिळेल अशी आशा आहे. त्यातच त्यांनी पत्रकांरांशी बोलताना भाजपकडून अजुनही कोणाला सुचना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे शेवटच्या टप्यात काय होईल हे सांगता येत नाही असे सुचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे नक्की उमेदवार कोण ? याचा सप्सेन्स आणखीच वाढला आहे.

पक्ष सातारकरांचा कौल घेऊन उमेदवारी देईल

भारतीय जनता पक्षातून खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale , मी, धैर्यशील कदम आणि अजूनही अनेक उमेदवार अपेक्षीत आहेत. मला विश्वास आहे की सातारकरांचा कौल घेवुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यंत्री देवेद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघे एक चांगला उमेदवार देण्याचा निर्णय घेतील. त्यांच्याकडून लवकरात लवकर उमेदवारी जाहीर होईल मात्र उमेदवार कोणीही असु शकतो, अशीही आशा नरेंद्र पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे. त्यामुळे पक्ष सातारकरांचा कौल घेवुन उमेदवारीचा काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Satara Loksabha Election
Lok Sabha Election 2024: निवडणुकीची घोषणा होऊन महिना उलटला तरी 12 जागांचा 'जुगाड' काही केल्या जुळेना !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com