Uddhav Thackeray News :''अजितदादांना ताप की सहकाऱ्यांचा मनस्ताप, हे...'' उद्धव ठाकरेंचा टोला!

Uddhav Thackeray and Ajit Pawar News : अजित पवारांनी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे.
udhhav thakary and ajit pawar
udhhav thakary and ajit pawarsarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : उपमुख्यमंत्री अजित पवार हे मागील काही दिवसांमध्ये डेंग्यूमुळे आजारी होते. त्यामुळे शासकीय तसेत कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ते दिसत नव्हते. शिवाय, त्यांनी ट्वीटद्वारे डेंग्यू आजारपणाबाबत अपडेटही दिलं होतं. ज्यामध्ये त्यांनी आणखी काही दिवस डॉक्टारांनी विश्रांतीचा सल्ला दिला असल्याचे सांगितले होते. एवढच नाहीतर त्यांनी यंदा दिवाळीत कुणाला भेटता येणार नाही,असंही कार्यकर्त्यांना कळवलं होतं.

मात्र त्यानंतर अजित पवार थेट दिल्लीला गेले आणि तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची त्यांनी भेट घेतली. यावरून आता राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

udhhav thakary and ajit pawar
Uddhav Thackeray News : ''तुम्ही मधमाश्यांच्या पोळ्यावर दगड मारलाय, आता...'' उद्धव ठाकरेंचा थेट इशारा!

अजित पवारांनी अमित शाह यांची भेट घेतली. तेव्हा त्यांच्यासोबत खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे हेसुद्धा उपस्थित होते. तर ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी अजित पवारांवर निशाणा, साधल्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही पत्रकारपरिषदेत बोलताना अजित पवारांना टोला लगावला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, ''माझा आता अजितदादांशी काहीच संपर्क नाही. त्यामुळे त्यांना कसला नेमका ताप आहे, सहकाऱ्यांचा ताप मनस्ताप ताप आहे की मनस्ताप आहे. हे त्यांना माहीत, मला नाही माहीत.''

याशिवाय, "अजितदादा आजारी असतानाही अमित शाहांना भेटले. पूर्वी आजारी माणसांना भेटायला लोक यायचे. आता राज्यात आता नवी परंपरा सुरू झाली आहे. आजारी माणूसच दुसऱ्यांना भेटायला जात आहे," असा मिश्किल टोला राऊतांनी अजितदादांना हाणला आहे.

अजित पवारांनी काय केलं होतं ट्वीट? -

आजारपणाबाबत माहिती देताना अजित पवार म्हणाले, ''गेल्या काही दिवसांपासून मी डेंग्यूमुळे आजारी असून डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार आणि सक्तीची विश्रांती घेत आहे. आजारामुळे अशक्तपणा, थकवा जाणवत असला तरी प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. पूर्णपणे बरं होण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. डॉक्टरांनी गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा तसंच मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. आजारपणामुळे आपल्या सर्वांपासून नाईलाजानं दूर रहावं लागणं हे त्रासदायक आहे.''

याशिवाय ''दरवर्षी दिवाळीत मी आपल्या सर्वांना भेटत असतो. दिवाळी पाडवा स्नेहमिलनाच्या निमित्तानं भेटीगाठी, शुभेच्छांची देवाण-घेवाण होत असते. यावर्षी पुढचे काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्याला भेटता येणार नाही. परंतु माझ्या सदिच्छा कायम आपल्यासोबत आहेत. आपल्या सर्वांना, आपल्या कुटुंबियांना, नातेवाईक आणि मित्र परिवाराला दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सर्वांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश, धनधान्याची समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो अशी प्रार्थना करतो.'' असंही अजित पवारांनी सांगितलं होतं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com