Uddhav Thackeray : उध्दव ठाकरेंचे खासदार गवळींना टोले अन् बच्चू कडूंच्या जखमेवर मीठ...

आम्ही त्यांना मंत्री केले होते, पण ते नाही पचलं...
Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख ऊध्दव ठाकरे यांनी बुलढाणा जिल्हयातील चिखली येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी व अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्यावर देखील निशाणा साधला होता. (Uddhav Thackeray Latest News)

ठाकरे यांनी आपल्या भाषणात खासदार भावना गवळीं(Bhavna Gawali) वर टीकेची झोड उठवताना आपल्या पलिकडच्या ताई तुम्हाला माहिती आहेत. त्यांना शिवसेनेनं अनेकदा खासदार केलं. मात्र, ताईंना धमक्या देण्यात आल्या. मुंबईहून इकडे दलाल पाठवण्यात आले. त्यांच्या चेलेचपाट्यांना अटक झाली. पण ताई मोठ्या हुशार निघाल्या. ताईंनी थेट दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधली. तो राखी बांधल्याचा फोटो छापून आणला आणि मग तो फोटो छापून आल्यावर ताईंवर कारवाई करण्याची ईडी-सीबीआयवाल्यांमध्ये हिंमत आहे का? आणि त्या तिकडे गेल्यावर त्यांना संरक्षण मिळालं असे ठाकरे म्हणाले होते.

Uddhav Thackeray News
Deepak Kesarkar : उद्धव ठाकरेंच्या टिकेने संयमी केसकरही संतापले...

तर बच्चू कडू यांच्याबद्दल बोलताना उध्दव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आम्ही त्यांना मंत्री केले होते, पण ते नाही पचलं. त्याला आम्ही काय करावं. आता इकडे तिकडे फिरताहेत. आणि कुठेही कार्यक्रमात गेलो तर खोकेवाले, खोकवाले म्हणून टीका सहन करावी लागते असं आता तेच सांगताहेत म्हणत ठाकरेंनी कडूंना टोला लगावला होता.

Uddhav Thackeray News
Eknath Shinde : शिंदे गटात नाराजी; चार मंत्री अन् सहा आमदारांनी मुख्यमंत्र्यांचा दौरा टाळला?

भाजप हा पक्ष आहे की चोरबाजार?

आजचा भाजपा हा पक्ष आयात पक्ष झाला आहे. त्यांचे विचार संपले, नेते संपले, आता तो भाकड पक्ष झाला आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत फक्त यादी काढा आणि त्यात बाहेरून त्यांच्या पक्षात आयात केलेले किती लोक आहेत हे पाहा. त्यामुळे हा आयात पक्ष झाला आहे. आयात पक्षाची सुरू असलेली दादागिरी, हुकुमशाही आपल्या मर्द मावळ्यांना मोडता येणार नाही का? अरे हा पक्ष आहे की चोरबाजार? त्यांच्याकडे स्वतःकडे काहीच शिल्लक राहिलं नाही. ते बाहेरून चोरून इतरांचे नेते घेत आहेत आणि आपल्याविरोधात त्यांना उभे करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com