Deepak Kesarkar : उद्धव ठाकरेंच्या टिकेने संयमी केसकरही संतापले...

Deepak Kesarkar News : 'फ्रिजचे मोठे खोके भरून पैसे कोणाकडे गेले हे...'
Deepak Kesarkar, Udhav Thackeray
Deepak Kesarkar, Udhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Deepak Kesarkar News : ''खोके-खोके म्हणून कोणाला हिणवता. एक दिवस या आमदारांचा संयम सुटेल त्यावेळी तुम्हाला समजेल. फ्रिजचे मोठे खोके भरून पैसे कोणाकडे गेले हे जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाही'', असं म्हणत शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर चांगलेच आक्रमक झाले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुलडाण्यातील शेतकरी संवाद मेळाव्यात शिंदे गटावर जोरदार टीका केली. या टिकेला प्रतिउत्तर देताना एका वृत्तवाहिनीशी केसकर बोलत होते.

मंत्री केसरकर म्हणाले, ''तुम्ही कोणाला गद्दार म्हणता तुम्हाला भेटायला २५ आमदार आले होते. ते तुम्हाला सांगत होते हिंदुत्वापासून दूर जायला नको, आपण कॉंग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीपासून (NCP) दूर जाऊ, पण तुम्ही ऐकलं नाही. आता तर तुम्ही खोटं बोलण्याची मोहीम चालवलीय. मात्र तुम्ही कोणाची बदनामी करता? ज्या लोकांनी तुमच्यासाठी पूर्ण जीवन ओतलं त्यांची बदनामी करता. पण ज्या कॉंग्रेस, राष्ट्रवादीसाठी हिंदुत्व सोडलं ना त्यांना विचारा आयोध्याची रथयात्रा कोणी आडवली होती. आता हिंदुत्व कोणाला शिकवता'', असं म्हणत केसरकर चांगलेच संतापले.

Deepak Kesarkar, Udhav Thackeray
Uddhav Thackeray : ठाकरेंनी भरसभेत 'तो' ऑडिओ ऐकवला, फडणवीसांच्या 'त्या' मागणीची केली पोलखोल

''आमची बदनामी करण्यासाठी तुमचे माणसं महाराष्ट्रभर फिरतात. पण बदनामी करण्याची पण एक मर्यादा असते हे लक्षात घ्या.आम्ही जर तुमच्याबद्दल बोलायला लागलो तर तुमचीही बदनामी होईल. आता पाणी नाकाच्या वर गेलंय. पाणी नाकाच्यावर गेलं तर माकड सुद्धा आपल्या लेकराला खाली घालून आपला जीव वाचवतं. मात्र तुमचा आदर आहे म्हणून आम्ही बोलत नाहीत'', असं म्हणत केसरकरांनी एक प्रकारे उद्धव ठाकरेंना इशाराही दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com