Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरेंच्या बैठकीत ठरली योजना; गावागावात सरकारच्या विरोधात..

Uddhav Thackeray Meeting with Shivsainik : शिवसेना वर्धापनदिन जोरात साजरा करायचा ...
Uddhav Thackeray News :
Uddhav Thackeray News :Sarkarnama

Mumbai News : शिवसेना ठाकरे गटाची आज शिवसेना भवन (Shivsena Bhavan) इथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. राज्यातील सर्व जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांची ही बैठक होती. या बैठकीत ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या आगामी निवडणुका आणि पक्षाच्या सभा याबाबत मार्गदर्शन केले. पक्षाचं वर्धापनदिनानिमित्तही विशेष तयारी करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.

Uddhav Thackeray News :
Devendra Fadnavis Health News : उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रकृती बिघडली? ; काय आहे सत्य?

बैठक पार पडल्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी माध्यमांशी संवाध साधताना सांगितले की, या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाची आपल्या बाजूने निकाल लागल्याची तांत्रिक माहिती जिल्हाप्रमुखांना देण्यात आली. कारण काही जण निकाल विरोधात लागले असे असतानाही, पेढे वाटत आहेत.

हा निकाल महाराष्ट्राच्या गावागावातल्या, तळागाळातल्या शेवचच्या माणसांपर्यंत पोहचवण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे, शिवसेनेचा वर्धापन (Shivsena Anniversary Ceremony) दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

Uddhav Thackeray News :
Deputy chief minister devendra fadanvis : मंत्रिमंडळ विस्तार ; फडणवीस काय बोलून गेले ?

बैठकीत काय झालं -

सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) निर्णय राज्यातील लोकांपर्यंत पोहोचवा. सत्तासंघर्षाच्या निकाल हा आपल्या बाजूने लागला आहे. सरकार बेकायदेशीर आहे, असं न्यायालयाने सांगितले आहे. मात्र शिंदे गट आणि भाजप (BJP News) चुकीची माहिती पसरवत आहेत. हे लोकांना समजावून सांगा.

"न्यायालयाचे मुद्दे, आपल्या बाजूचे सकारात्मक मुद्दे लोकांना समजावून सांगा. शिंदे गटाचे प्रतोद म्हणून भरत गोगावले (Bharat Gogawale) आणि गटनेतेपदी असलेले शिंदेना न्यायालयाने बेकायदेशीर ठरवलं," असं जनतेला पटवून द्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com