Shivsena News : उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर; शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांना 24 जानेवारीला मुंबईत बोलावले

District Chief Meeting in Mumbai : मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्धार शिवसेना नेत्यांनी जाहीरपणे बोलून दाखवला आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी अजून त्यावर भाष्य केलेले नाही, त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेना खरोखर स्वबळावर लढणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 21 January : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे ॲक्शन मोडवर आले आहेत. विधानसभेतील पराभव धुवून काढण्याचा निर्धार शिवसेनेने केलेला आहे, त्यादृष्टीने पक्षाकडून पावले उचलली जात आहेत. मुंबई महापालिकेसाठी उद्धव ठाकरेंनी अगोदरच आपल्या शिलेदारांना कामाला लावले आहे. आता राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांची येत्या शुक्रवारी (ता. २४ जानेवारी) मुंबईत बैठक बोलावली आहे. त्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्धार शिवसेना नेत्यांनी जाहीरपणे बोलून दाखवला आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी अजून त्यावर भाष्य केलेले नाही, त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेना खरोखर स्वबळावर लढणार का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी २४ जानेवारीला जिल्हाप्रमुखांची बोलावलेली बैठक महत्वपूर्ण ठरते.

राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांना 24 जानेवारी रोजी होणाऱ्या शिवसेनेच्या बैठकीला बोलावण्यात आलेले आहे. मुंबईतील शिवसेना भवनात ही बैठक होणार आहे. या बैठकीला सर्व जिल्हाप्रमुखांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

Uddhav Thackeray
Shivsena UBT : शिवसेना 'त्या' मुद्यावर मुख्यमंत्री फडणवीसांना पाठिंबा देणार; ठाकरे गटाच्या नेत्याचे मोठे विधान

लोकसभा निवडणुकीतील यश आणि विधानसभा निवडणुकीतील अपयश तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीबाबत ठाकरे कोणता कानमंत्र शिवसैनिकांना देणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.

दरम्यान, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त येत्या 23 जानेवारी रोजी अंधेरीत शिवसेनेच्या मेळाव्याचे आयोजनही करण्यात आलेले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या पराभवामुळे आलेली मरगळ झटकून शिवसैनिकांना कशा प्रकारे चार्ज करणार, याची उत्सुकता असणार आहे.

Uddhav Thackeray
Morning Oath Ceremony : पहाटेच्या शपथविधीचं षडयंत्र कोणी रचलं?; छगन भुजबळांनी सांगितली इनसाईड स्टोरी

ठाकरे-पवार भेटीचे रहस्य

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी सोमवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीबाबत काही बातम्या माध्यमांमध्ये आल्या आहेत, त्याबाबत उद्धव ठाकरेंनी पवार यांच्याशी चर्चा झाली, असे संजय राऊत यांनी सांगितले. तसेच, विधानसभा निकालानंतर ही पहिलीच भेट असल्याने निकालावर चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com