Uddhav-Raj Thackeray Meeting : ठाकरे बंधूंच्या अडीच तासांच्या भेटीनंतर मनसेबाबत मोठी अपडेट; 'शिवतीर्थ'वर हालचालींना वेग...

Uddhav Thackeray and Raj Thackeray’s 2.5-Hour Meeting Explained : युतीसाठी उद्धव ठाकरे अतिशय आग्रही असल्याचे सांगितले जात आहे. राज ठाकरेंकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानेच आजची अत्यंत महत्वाची बैठक पार पडल्याची चर्चा आहे.
Raj Thackeray Meet Uddhav Thackeray
Raj Thackeray Meet Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Major Update on MNS After Thackeray Brothers’ Discussion : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बुधवारी ‘शिवतीर्थ’वर बैठक झाली. दोन्ही पक्षांच्या काही प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीमध्ये युती, जागावाटप, महाविकास आघाडी आदी मुद्द्यांवर चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता मनसेच्या गोटातून मोठी अपडेट समोर आली आहे.

गणेशोत्सवादरम्यान उद्धव ठाकरेंनी राज यांच्या निवासस्थानी सहकुटुंब जात गणरायाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर बुधवारी त्यांनी पुन्हा शिवतीर्थ गाठले. यावेळी त्यांच्यासोबत संजय राऊत आणि अनिल परब हेही होते. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ते राज यांच्या घरी दाखल झाले होते. आगामी महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याबाबतची चर्चा आता अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे.

युतीसाठी उद्धव ठाकरे अतिशय आग्रही असल्याचे सांगितले जात आहे. राज ठाकरेंकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानेच आजची अत्यंत महत्वाची बैठक पार पडल्याची चर्चा आहे. या बैठकीनंतर आता राज यांनी गुरूवारी सकाळी शिवतीर्थवर मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावल्याचे समजते. या बैठकीमध्येही युतीबाबत महत्वाची चर्चा होऊ शकते.

Raj Thackeray Meet Uddhav Thackeray
IPS Anjana Krishna update : अंजना कृष्णा यांना मिळालं मोठं पाठबळ; मेरिटवर बोलत सुप्रिया सुळेंनी नेत्यांना घेतलं फैलावर

बैठकीत काय चर्चा झाली?

ठाकरे बंधूंच्या बैठकीमध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली असावी, याबाबत उत्सुकता वाढली आहे. बैठकीत युतीसह जागावाटप, महाविकास आघाडी हे मुद्दे प्रमुख असू शकतात. युती केवळ मुंबईपुरतीच असेल की इतर ठिकाणीही युती म्हणूनच सामोरे जायचे, जागावाटप कसे होणार, उद्धव ठाकरे महाविकास आघाडीची साथ सोडणार का, दोन्ही ठाकरे केवळ मुंबईतच एकसाथ आल्यास इतर ठिकाणी ठाकरे आघाडीसोबत जातील का, राज ठाकरेंना हे मान्य होईल का, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.

Raj Thackeray Meet Uddhav Thackeray
Jagdeep Dhankhar News : राधाकृष्णन विजयी होताच जगदीप धनखड यांनी धाडले पत्र; राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच बोलले...

उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून दसरा मेळाव्याचीही तयारी सुरू करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे या मेळाव्याला उपस्थित राहणार, अशी चर्चाही सुरू झाली होती. पण संजय राऊत यांनी ही चर्चा फेटाळून लावली होती. आजच्या बैठकीनंतर दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडून युतीबाबत मोठी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com