Uddhav On Raj Thackeray: मनसेने युतीचा प्रस्ताव दिला तर काय कराल? उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच भूमिका मांडली ; म्हणाले..

Uddhav Thackeray On Alliance With Raj Thackeray: उद्धव ठाकरेंनी सूचक उत्तर दिले
Uddhav Thackeray, Raj Thackeray
Uddhav Thackeray, Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Shivsena Podcast: अजित पवारांच्या बंडानंतर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र यावेत, अशी चर्चा सुरु आहे.'राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे,' असे फलकही अनेक ठिकाणी झळकले होते. हे दोन भाऊ खरंच एकत्र येणार का? याबाबत उद्धव ठाकरेंनी आज रोखठोक उत्तर दिले.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा दुसरा भाग आज (गुरुवारी) प्रसिद्ध करण्यात आला. राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीबाबत राऊतांनी त्यांना प्रश्न विचारला. त्यावर उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Uddhav Thackeray, Raj Thackeray
BJP MLA Suresh Bhole : रस्ता दुरुस्ती निधीचा वाद थेट मुखमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या दरबारात ; आमदार भोळेंची तक्रार..

राऊतांनी "राज ठाकरे आणि तुम्ही एकत्र येणार असल्याची चर्चा होती. त्याला काही आधार आहे काय?' असा प्रश्न उद्धव ठाकरेंना केला. त्यावर उद्धव ठाकरेंनी सूचक उत्तर दिले. ते म्हणाले, " युतीबाबतच्या चर्चांना आधार असता तर चर्चा थांबली नसती ना…तुम्हीच सांगितलं चर्चा झाली आणि चर्चा थांबली. आता ज्यांनी कुणी चर्चा करण्याचा प्रयत्न केला असेल त्याला आधार मिळाला नसेल म्हणून चर्चा थांबली असावी,"

युतीबाबत मनसेकडून चर्चेचा प्रस्ताव आला तर काय कराल? या प्रश्न राऊतांनी ठाकरेंना विचारला. त्यावर ते म्हणाले, "प्रस्ताव आला तर… गेला तर… याच्यावर मी कधी विचार करीत नाही. त्या क्षणाला काय असतं त्याचा विचार करतो. त्याच्यामुळे आता तरी अशी काही चर्चा नाही. त्यामुळे असे बोलण्याचीही काही आवश्यकता नाही,"

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com