Thackeray and Raut Meet Pawar: उद्धव ठाकरे, संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट; 'सिल्व्हर ओक'वर दोन तास खलबतं

Political News: उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि शरद पवार व जयंत पाटील यांच्यात आगामी रणनितीसंदर्भात चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
Thackeray and Raut Meet Pawar
Thackeray and Raut Meet PawarSarkarnama

Mumbai News: आगामी लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाच्या हालचाली वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवरच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यातदेखील बैठकांचा सपाटा सुरू असून, मंगळवारी उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि शरद पवार यांच्यात 'सिल्व्हर ओक'वर जवळपास दोन तास खलबतं झाली.

या बैठकीत लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात चर्चा झाल्याचे सांगण्यात येत असून, याबरोबरच 'इंडिया'आघाडीच्या बैठकीसंदर्भातदेखील चर्चा झाली. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी विरोधी पक्षाकडून 'इंडिया'आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे विरोधक आणखी काय रणनीती आखतात, याकडे 'एनडीए'च्या नेत्यांचे लक्ष लागलेले आहे.

यातच मंगळवारी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि शरद पवार व जयंत पाटील यांच्यात आगामी रणनितीसंदर्भात चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. याबरोबरच सध्या राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या विषयाबद्दल तसेच आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्षांकडून सुरू होत असलेल्या सुनावणीबाबतदेखील सविस्तर चर्चा झाली.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात लवकरच महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांमध्ये खलबतं होणार असून, महाविकास आघाडी आगामी लोकसभा निवडणुका एकत्र लढविण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Edited by - Ganesh Thombare

Thackeray and Raut Meet Pawar
Chandrababu Naidu Arrested: चंद्राबाबू नायडूंची हायकोर्टात धाव; बेल की पुन्हा जेल ? बुधवारी होणार फैसला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com