Mahavikas Aghadi : लोकसभेला हिसका; ठाकरे, पवारसाहेब अन् पटोले महायुतीविरोधात कोणता डाव टाकणार?

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं महायुतीला चितपट केलं होतं. यानंतर विधानसभा निवडणुका हे महाविकास आघाडीचे लक्ष्य असणार आहे.
nana patole | uddhav thackeray | sharad pawar
nana patole | uddhav thackeray | sharad pawarsarkarnama

mumbai News, 15 June : लोकसभा निवडणुकीत ( Lok Sabha Election 2024 ) एकजूट दाखवून सत्ताधीश भाजपला ( Bjp ) हिसका दाखविलेली महाविकास आघाडीत विधानसभा निवडणुकीतही एकी राहणार असून, या निवडणकीत पुन्हा शिंदे, फडणवीस आणि अजितदादांविरोधात ठाकरे-पवार नवे डाव टाकण्याच्या विचारात आहेत.

त्याआधीच विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना हरवून, राज्य काबीज करण्याचा इरादा पवारसाहेबांनी केला आहे. हे सरकार पाडण्यासाठी जे काही करावे लागणार, ते करण्याच्या उद्देशाने ठाकरे ( Uddhav Thackeray ), पवारसाहेब ( Sharad Pawar ) आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) हे तिघे तेही एकत्रपणे पुढच्या काही तासांत मीडियापुढे येणार आहे.

त्यामुळे ठाकरे-पवार-पटोले काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असेन. मात्र, आघाडीच्या ‘पॉवर’ची धास्ती घेतलेल्या सत्ताधीशांचे टेन्शनही वाढू शकते. दुपारी दोन वाजता मुंबईत यशवंतराव चव्हाण केंद्र येथे महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेना ( ठाकरे गट ), राष्ट्रवादी ( शरदचंद्र पवार ) काँग्रेस पक्षांची महाविकास आघाडी आणि भाजप, शिंदे गट, अजित पवार गट यांची महायुती यांच्यात थेट लढत झाली होती. या लढाईत भक्कम एकजूट दाखवत महाविकास आघाडीनं 48 पैकी 31 जागा जिंकून महायुतीचा धुव्वा उडवला होता.

nana patole | uddhav thackeray | sharad pawar
Vishal Patil On Jayant Patil : "जयंत पाटील महाविकास आघाडीसोबत असल्यानं सेफ"; विशाल पाटील असं का म्हणाले?

त्यानंतर महाविकास आघाडी आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज होत असून या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद महत्त्वाची असणार आहे. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही उपस्थित राहणार आहेत.

nana patole | uddhav thackeray | sharad pawar
Uddhav Thackeray & MP Sanjay Raut : ठाकरे, राऊतांना कोर्टाने ठोठावला दंड ! काय आहे कारण..

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 27 जूनपासून सुरू होत आहे. महायुतीच सरकारचे हे शेवटचे अधिवेशन असेल. त्यावेळी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. तसेच, चार महिन्यांत विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. यासंदर्भात पत्रकार परिषद झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांत चर्चा होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com