Video Legislative Council Election 2024 : विधानपरिषद निवडणुकीविरोधात ठाकरे गट न्यायालयात जाणार; नेमकं कारण काय?

Legislative Council Election 2024 News : विधानपरिषदेच्या 12 जुलै रोजी होणाऱ्या 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्याची घोषणा निवडणूक आयोगानं केली आहे.
Legislative Council Election 2024
Legislative Council Election 2024sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 20 June : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. विधानसभा सदस्यांमधून होणाऱ्या या निवडणुकीविरोधात शिवसेना ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

आमदार अपत्रात संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात ( Supreme Court ) सुनावणी प्रलंबित आहे. त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे विधानपरिषद निवडणूक घेणं हे घटनाबाह्य असल्याचा ठाकरे गटाचा दावा आहे.

त्याच पार्श्वभूमीवर विधानपरिषदेच्या 12 जुलै रोजी होणाऱ्या 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्याला स्थगिती देण्यासाठी ठाकरे गट ( Shivsena Thackeray Camp ) लवकरच सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत आहे.

सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रेबाबत खटला सुरू आहे. आमदारांवर अपात्रेची टांगती तलवार आहे. त्यामुळे या आमदारांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान करणं आणि आमदार निवडून आणणे हे घटनाबाह्य असल्याचं ठाकरे गटाकडून सांगण्यात येत आहे.

Legislative Council Election 2024
Legislative Council Election : महायुती की मविआ कोण ठरणार 'किंग'; दादा अन् शिंदेंचे आमदार फुटणार?

त्याशिवाय पक्ष फुटीनंतर काही आमदारांचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात आहेत. त्यात पक्ष सोडणार नाही, याची ग्वाही दिल्यानंतरही ते शिंदे गटात गेले. त्यामुळे आमदारांना विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार कसा देणार? असा सवाल ठाकरे गटाकडून उपस्थित केला जात आहे.

Legislative Council Election 2024
Uddhav Thackeray on Hindutva : 'नरेंद्र मोदी आणि भाजपने सत्तेसाठी हिंदुत्व सोडलेलं आहे' ; उद्धव ठाकरेंचा आरोप!

यासंदर्भात ठाकरे गट कायदेतज्ज्ञांची आज बैठक घेणार आहे. त्यानंतर ठाकरे गट न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com