बीकेसीवर येऊन उद्धव ठाकरेंनी एकदा गर्दी पाहावी : शहाजीबापूंचे आव्हान

Shahajibapu Patil : एकनाथ शिंदे यांनी गुहाहाटी येथून येताना आयुर्वेदीक औषध आणले आहे. ते पिऊन अंगात बळ आले आहे.
Shahajibapu patil
Shahajibapu patil Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेतल्या फुटीनंतर आज मुंबईत दोन दसरा मेळावे पार प़डत आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडून बीकेसी मैदानात मेळाव्याची तयारी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानातही लगबग सुरू आहे. राज्यभरातून दोन्ही गटाचे समर्थक मुंबईत पोहचले आहेत. आता शिंदेच्या मेळाव्यात सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर बरसून टिका केली.

यावेळी शहाजीबापू पाटील म्हणाले, "काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपासला. एकनाथ शिंदे यांनी गुहाहाटी येथून येताना आयुर्वेदीक औषध आणले आहे. ते पिऊन अंगातबळ आले आहे. म्हणून मी आता बोलतोय. उद्धव ठाकरेंनी एकदा येऊन बीकेसीवरची गर्दी पाहावी," असेही शहाजीबापू म्हणाले.

दरम्यान अवघ्या काही तासातच मुंबईत शिंदे आणि उद्धव ठाकरे गटांचा दसरा मेळावा होत आहे. या मेळाव्यांमधून मोठे राजकीय भूकंप आणि उलथापालत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी आज शिंदे मेळाव्यात उद्धव ठाकरे गटाचे पाच आमदार आणि दोन खासदार प्रवेश करणार असल्याचा दावा केला आहे.

राज्यातील सर्व नागरिकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देताना शिंदे म्हणाले, मराठी अस्मितेसाठी, मराठी बाण्याचे तेज राखण्यासाठी, हिंदुत्वाचा अमुल्य ठेवा जपण्यासाठी… आपण भेटतोय बीकेसी मैदानावर. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा,'' टीझर शेअर केला आहे. चलो बीकेसी हा हॅशटॅग त्यांनी वापरला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com