श्रीधर पाटणकरांना 'क्लिनचीट' : ठाकरे-भाजपमध्ये दिलजमाई ?

सत्तासंघर्षातून वाद भडकला असतानाच पाटणकरांना 'क्लिनचिट' मिळाल्याने राजकीय वर्तुळ पुन्हा च्रकावले आहे.
devendra fadnavis, shridhar patankar,uddhav thackeray
devendra fadnavis, shridhar patankar,uddhav thackeraysarkarnama

मुंबई : शिवसेनेच्या गोटातले चार डझन आमदार पळवून 'मातोश्री'वरचा सत्तेचा रिमोट दिल्लीत नेलेल्या भाजपने आता शिवसेनेचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे (uddhav thackeray) मेहुणे श्रीधर पाटणकरांना (shridhar patankar) 'सीबीआय'च्या तावडीतून सोडून 'युती'चे दरवाजे उघडे ठेवल्याचे बोलले जात आहे. भाजपमधील एक जुना नेता ठाकरे आणि भाजपमधील वैर दूर करण्यासाठी पुढाकार घेत आहे. त्यामुळे दोघांमध्ये समेट घडू शकतो, अशी चर्चा आहे. (shridhar patankar news)

दुसरीकडे, सत्ता गेल्यानंतर भाजपचा जाच नाकातोडांशी येऊन भलतेच काही घडण्याआधी ठाकरे यांनीही शिताफिने आपल्या मेहुण्याची सुटका करून घेतल्याची चर्चा रंगली आहे. या प्रकरणावरून शिवसेना-भाजपमध्ये समेट घडू शकतो, याचीही शक्यता वर्तवली जात आहे. या दोन्ही पक्षांत सत्तासंघर्षातून वाद भडकला असतानाच पाटणकरांना 'क्लिनचिट' मिळाल्याने राजकीय वर्तुळ पुन्हा च्रकावले आहे.

devendra fadnavis, shridhar patankar,uddhav thackeray
उद्धव ठाकरेंच्या मेहुण्याला सीबीआयकडून दिलासा

शिवसेनेला नमविण्यासाठी थेट मातोश्रीच्या दिशेने कूच केलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांनी पाटणकरांभोवतीचा फास सैल करून, भाजपने शिवसेनेला अजून वेळ गेली नसल्याचा सांगावाच धाडल्याचा मुद्दा पुढे येत आहे. तर, पाटणकरांवरील अर्थात, पहिल्यांदा कुटुंबावरील कारवाई टाळून शिवसेना पुन्हा भाजपशी जुळवून घेण्याच्या मूडमध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

फोडाफोडीवरून शिवसेना-भाजपमधील रस्त्यावरच्या लढाईला धार येत असतानाच पाटणकरांमुळे या दोन्ही पक्षात 'दिलजमाई' ही होण्याची शक्यता आहे. पुढच्या राजकारणाचा विचार करता या दोन्ही पक्षांना एकमेकांपासून लांब राहाणे राजकीयदृष्ट्या परवडणारे नसल्याने जुन्या 'युती'ला तूर्त 'छुपा'प्रारंभ झाल्याचे मानले जात आहे.

उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (shridhar patankar) यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे, त्यांच्याविरोधात कारवाईसाठी सबळ पुरावे नसल्याचा (क्लोजर रिपोर्ट)अहवाल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) दिला आहे.

हा अहवाल न्यायालयाने स्वीकारला आहे. ईडीचा विरोध असूनही विशेष सीबीआय न्यायालयाने क्लोजर रिपोर्ट स्वीकारला आहे. श्रीधर पाटणकर व्यवसायाने बिल्डर आहेत. मुंबई आणि ठाण्यात प्रामुख्याने त्यांचे प्रकल्प आहेत.

पाटणकर गेल्या काही महिन्यापासून सीबीआय, ईडीच्या रडार होते. ८४.६ कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी ईडीने युनियन बँकेचे अधिकारी, काही ज्वेलर्स आणि पुष्पक बुलियन कंपनीचे संचालक यांच्याविरोधात मनी लाँड्रिगचा गुन्हा दाखल केला होता. त्याचा तपास सुरु होता. याप्रकरणी ईडीनं श्रीधर पाटणकर यांची साडे सहा कोटींची मालमत्ता जप्त केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com