Uddhav Thackeray On BJP Fadnavis : मुख्यमंत्र्यांना तोंड दाखवायला जागा नाही, ते फक्त दुसऱ्यांच्या पापावर पांघरूण घालतायत; भ्रष्ट मंत्र्यांच्या कारभारावरून ठाकरेंचा टोला

Uddhav Thackeray Slams Fadnavis Over Inaction on Corrupt Ministers in Mahayuti Govt : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांच्या कारभारावरून भाजप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
Uddhav Thackeray On BJP Fadnavis
Uddhav Thackeray On BJP FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mahayuti government corruption : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाने राज्य महायुती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्‍यांच्या कारभारावरून आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी करत, संपूर्ण महाराष्ट्रात जनआक्रोश आंदोलन केले.

या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. 'उद्धव ठाकरे यांनी जनादेशाची चोरी केली', असा घणाघात केला. त्याला ठाकरेंनी मुंबईतील पत्रकार परिषदेतून जोरदार प्रत्युत्तर दिले. 'महायुती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांमुळे मुख्यमंत्र्यांना तोंड दाखवायला जागा राहिली नाही', असा टोला उद्धव ठाकरे यांना लगावला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत (Mumbai) पत्रकार परिषद घेतली. शिवसेनेने महायुती सरकारमधील भ्रष्ट कारभाराविरोधात केलेल्या राज्यव्यापी आंदोलनावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. ही देताना, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, "मुख्यमंत्र्यांकडे तोंड दाखवायला जागा नाही. त्यांनी दुसऱ्यांच्या पापावर पांघरूण घालायचं ठरवलं आहे. तसं कामचं त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी सोपवलं आहे. त्यावर मी काही जास्त बोलत नाही". दिल्लीत जो काही आज तमाशा झाला आहे, तो अतिशय लांछनास्पद होता, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

Uddhav Thackeray On BJP Fadnavis
Uddhav Thackeray EVM hacking claim : 'EVM' हॅकचं प्रत्याक्षिक भाजप नेत्यानं दाखवलं; उद्धव ठाकरेंनी आणखी एक वादाला तोंड फोडलं

'महाराष्ट्रातील भाजप महायुती सरकारच्या कारभातील भ्रष्ट मंत्र्यांविरोधात रान पेटवायचं ठवरलं आहे. ते महाराष्ट्रात आम्ही सुरू केलं आहे. लोकांना आवाहन आहे की, जिथं-तिथं भ्रष्टाचार मंत्र्यांच्याविरोधात आवाज उठवता येईल, ते उठवत राहा. या मत चोरीचा लोकसभेला फटका खाल्ला. बिहारमध्ये देखील तेच होत आहे. राहुल गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे हा देशाच्या लोकशाहीवरील दरोडा आहे', असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.

Uddhav Thackeray On BJP Fadnavis
Uddhav Thackeray : दिल्लीतील तमाशा 'लांछनास्पद', भाजप स्वतःवरील संकटांची सावरसावरी करतोय; उद्धव ठाकरेंचा घणाघात

'मत चोरीचा हा मुद्दा संपूर्ण देशभरात हा मुद्दा लावून धरला पाहिजे. लोकसभेला मत चोरी झाली. महाराष्ट्रात विधानसभेला देखील मत चोरी झाली. सहा महिन्यात 45 लाख मतं वाढली. त्यामुळे प्रत्येकानं मतदार यादी तपासावी', असंही आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.

'दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा सुरू असताना, खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असताना, लोकसभेत घाईघाईनं भाजप एनडीएनं दोन बिलं पास करून घेतली. हा नेमका काय प्रकार आहे, याची माहिती घ्यायला आपण खासदार संजय राऊत यांना सांगितला आहे', असेही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com