Uddhav Thackeray News: उध्दव ठाकरेंचा मोठा निर्णय; खासदार अनिल देसाईंच्या खांद्यावर महत्वाची जबाबदारी

Thackeray Group News : ठाकरे गटाकडून लोकाधिकार महासंघाची कार्यकारिणी जाहीर
Anil Desai, Uddhav Thackeray
Anil Desai, Uddhav ThackeraySarkarnama

Shivsena News : उध्दव ठाकरे यांची शिवसेनापक्षप्रमुख पदाची मुदत २३ जानेवारीला संपली आहे. तसेच या शिंदे गटानं मुख्यनेता पदावर दावा ठोकला आहे. याचवेळी केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेना पक्ष व धनुष्यबाणच चिन्हाबाबतचा निर्णय अद्याप दिलेला नाही. यामुळे ठाकरे गटानं लोकाधिकार महासंघाची कार्यकारिणी जाहीर केली आहे. खासदार अनिल देसाई यांच्या खांद्यावर उध्दव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

ठाकरे गटाकडून लोकाधिकार महासंघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना मध्यावर्ती कार्यालयातून याबाबतची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. लोकाधिकार महासंघाच्या अध्यक्षपदी खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Anil Desai, Uddhav Thackeray
Shinde & Fadnavis : शिंदे फडणवीस सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? 'ही' मोठी अपडेट समोर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. महासंघाच्या अध्यक्षपदी शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सरचिटणीसपदी प्रदीप मयेकर तर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी आमदार विलास पोतनीस आणि सुनील शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. दिनेश बोभाटे यांना संघटन सचिव करण्यात आले आहे. शिवसेना मध्यावर्ती कार्यालयातून ही माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली.

Anil Desai, Uddhav Thackeray
Bharat Jodo Yatra In Kashmir : भारत जोडो यात्रा काश्मीरात अन् दोन बॉम्बस्फोट; कॉंग्रेसचे अमित शहांना पत्र

उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून कायम राहणार की..?

बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनीच अर्थात 23 जानेवारी 2013 रोजी शिवसेना पक्षप्रमुखपदी उद्धव ठाकरेंची निवड झाली होती. त्यानंतर 2018 मध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या कार्यकारिणीने पक्षप्रमुख म्हणून पुन्हा निवड केली होती. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपली आहे. शिवसेना पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढे काय होईल? उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून कायम राहणार की, त्यांना पायउतार व्हावं लागणार का? निवडणुका घ्याव्या लागणार का? असे वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com