Uddhav Thackeray News : ठाकरेंकडून भाजपची तुलना अफजल खानाशी; म्हणाले, "पक्षांतर करा नाहीतर कुटुंबासह..."

Uddhav Thackeray Vs Devendra Fadnavis : "त्यांना कलंक शब्द लागण्याचे काही कारण नाही"
Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Uddhav Thackeray, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Thackeray Compare BJP With Afzal Khan : महाराष्ट्रातील राजकारण आता 'कलंक' या शब्दावरून पेटलेले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (ता. १०) नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर कठोर शब्दात टीका केली होती. फडणवीस हे नागपूरला लागलेले कलंक आहेत, असा उल्लेख ठाकरेंनी केला होता. ठाकरेंनी कलंक हा शब्द वापरल्यामुळे भाजप आता आक्रमक झाली. यानंतर मंगळवारी ठाकरेंनी फडणवीस हे कलंकीतच आहेत, असा पुनरूच्चार केला आहे. (Latest Political News)

Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Maharashtra Cabinet Expansion: राष्ट्रवादीसाठी भाजप सोडणार महत्त्वाची खाती....?

ठाकरे यांची गुजरात काँग्रेसचे माजी मंत्री शंकरसिंह वाघेला यांनी भेट घेतली. भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी भाजपसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी भाजप आणि फडणवीस हे कलंकीतच आहेत, असे ठाकरे यांनी ठामपणे सांगतिले. तसचे ठाकरेंनी भाजपची तुलना थेट अफजल खान याच्याशी केली. यामुळे आता राज्यात पुन्हा नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, "पूर्वी अफजल खान धर्मांतर करा नाही तर कुटुंबासह मारून टाकण्याची धमकी देत होता. आता भाजपही तशीच निती वापरत आहे. पक्षांतर करा नाहीतर ईडी, सीबीआय मागे लावून संपूर्ण कुटुंबच तुरुंगात टाकू अशी धमकी भाजप देत आहे. भ्रष्टाचाराचे आरोप करून विरोधकांना आधी कलंकित करायचे, नंतर पक्षांतर करवून त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचे."

Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Kalank Word Dispute : 'कलंक' शब्दावरून राजकीय घामासान; फडणवीसांच्या काविळ टीकेवर दानवे म्हणतात, 'कावळ्यांची..

यावेळी फडणवीस आणि भाजपला कलंक हा शब्द लागण्याचे काही कारणच नाही, असेही ठाकरे यांनी सांगितले. ते म्हणाले, "त्यांना कलंक शब्द एवढा लागण्याचे कारण काय? तुम्ही इतरांवर भ्रष्टाचाराचा आरोप करून कलंक लावला नाही का? तुमच्या मंत्रिामंडळात हसन मुश्रीफ आहेत, त्यांच्यावर तुम्ही आरोप केले होते. आता त्यांनाच तुमच्या सरकारमध्ये मंत्री केले आहे. त्यांच्यावर आरोप करून आता तुम्ही त्यांना मंत्रिमंडळात स्थान कसं दिले? त्यांच्यावर कलंक लावून आता तुम्ही त्यांना सामावून घेतलं."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com