Maharashtra Cabinet Expansion: राष्ट्रवादीसाठी भाजप सोडणार महत्त्वाची खाती....?

Maharashtra Politics : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन आठ दिवस उलटून गेले. पण अद्याप खातेवाटप करण्यात आलेले नाही.
Devendra Fadanvis, Eknath Shinde, Ajit Pawar
Devendra Fadanvis, Eknath Shinde, Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

Shinde-Fadnavis-Pawar Government Cabinet Expansion: अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन आठ दिवस उलटून गेले. पण अद्याप खातेवाटप करण्यात आलेले नाही. राज्याच्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाच्या चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच खातेवाटप करतील असेही सांगितले जात आहे. अशात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

एकनाथ शिंदे भाजपच्या मंत्र्यांकडे असलेली खाती राष्ट्रवादीच्या नेत्यांना देऊ शकतात. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ मंत्र्यांना खातेवाटप केले जाईल, पण यात शिवसेनेच्या मंत्र्यांची खाती काढून घेतली जाणार नाहीत. भाजपच्या मंत्र्यांकडे दोन तीन खात्यांचा कारभार आहे. अशा ज्या मंत्र्यांकडे दोन-तीन खात्यांचा कारभार देण्यात आला आहे. त्या मंत्र्यांकडून ती खाती काढून घेऊन ती राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना दिली जातील, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Devendra Fadanvis, Eknath Shinde, Ajit Pawar
Pune Police News: वाढत्या गुन्हेगारीवर 'मोक्का'चा उतारा : महिन्याला तीन 'मोक्का'; पण तरीही कमी होईना गुन्ह्यांचा टक्का

एकनाथ शिंदे यांच्या गटात 40 आमदार असून त्यातील 9 जण मंत्री आहेत. या ९ जणांकडे जणांकडे एकच खाते आहे. दुसऱ्या खात्याची जबाबदारी असली तरी ते ते कमी महत्त्वाचे आहे. दुसरीकडे भाजपच्या कॅबिनेट मंत्र्यांकडे मात्र 2-3 मोठी खाती आहेत. त्यामुळे या खातेवाटपात एखाद्या मंत्र्यांच्या खात्यावरही टाच येणार असल्याची शक्यता आहे.

सद्य स्थितीत मुख्यमंत्री शिंदेंकडे 13, तर फडणवीस यांच्याकडे 7 खात्यांचा कार्यभार आहे. याशिवाय गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, रवींद्र चव्हाण, अतुल सावे, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा यांच्याकडेही एकापेक्षा जास्त खाती आहेत. त्यामुळे या सर्वांना आपल्याकडे असलेली खाती राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना द्यावी लागतील, असेही सांगितले जाते.

याशिवाय, मुख्यमंत्री शिंदे स्वतःकडे नगरविकास, सामान्य प्रशासन तथा माहिती व जनसंपर्क ही खाती आहेत.ती त्यांच्याकडेच राहतील. तर फडणवीस यांच्याकडील अर्थ खाते अजित पवार यांच्याकडे दिले जाऊ शकते. पण गृहखाते फडणवीस स्वतःकडे ठेवतील, असाही एक अंदाज आहे.

उपमुख्यमंत्री, अजित पवार यांना अर्थ खाते मिळाले तरी, त्यांना पूर्ण अर्थसंकल्प मांडता येणार नाही. याच कारण म्हणजे, पुढच्या वर्षी लोकसभा व विधानसभा निवडणूका असल्याने ते अंतरिम अर्थसंकल्प मांडू शकतात, असाही एक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Devendra Fadanvis, Eknath Shinde, Ajit Pawar
Mantrimandal Vistar News: गोगावलेंनी वाढवलं शिंदे-पवारांचं 'टेन्शन'; मंत्रिपदांबाबत केला मोठा दावा

वैद्यकीय शिक्षण हे खाते गिरीश महाजनांच्या आवडीचे खाते आहे. ते खातेही त्यांच्याकडून काढून घेतले जाऊ शकते, पण त्यांनी या खात्यासाठी आग्रह धरला, तर त्यांच्याकडेच असेलेले अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे ग्रामविकास खाते राष्ट्रवादीला मिळू शकते. तर मंगलप्रभात लोढा यांच्याकडे महिला व बालकल्याण, पर्यटन व कौशल्य विकास ही 3 खाती आहेत. त्यातील एक किंवा दोन खात्यावर त्यांना पाणी सोडावे लागेल. त्यांना महिला व बालकल्याण मंत्रालय सोडावे लागेल.

रवींद्र चव्हाण यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा खातेही राष्ट्रवादी काँग्रेसला मिळू शकत. चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते कायम राहू शकते. चंद्रकांत पाटील यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कामकाज ही 3 खाती आहेत. त्यातील दोन खाती राष्ट्रवादीकडे जाऊ शकतात.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com