Uddhav Thackeray On Loksabha : ठाकरेंना हव्यात लोकसभेच्या १९ जागा ; जागावाटपाचा तिढा 'इंडिया' सोडवणार कसा?

Uddhav Thackeray On Lok Sabha Seats : १९ जागांवर मागणी करून शिवसेना ठाकरे गटाने एक पाऊल पुढे टाकले आहे.
Uddhav Thackeray On Loksabha
Uddhav Thackeray On Loksabha Sarkarnama

Mumbai News : पुढील काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकींसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. याच अनुषंगाने भाजपविरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीची बैठक ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी मुंबईत पार पडत आहे. यामध्ये आघाडीतील घटक पक्षांचा जागा वाटपावर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे २०१९ साली शिवसेनेने जिंकलेल्या १९ जागा उद्धव ठाकरे गटाकडून लढवण्याचा आग्रह केला जात आहे. ठाकरेंची ही ही मागणीची पूर्ती करायची म्हणजे, परिणामी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला कमी जागा जाण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

Uddhav Thackeray On Loksabha
NCP Vs Sambhajiraje : '' आपण पुरोगामी विचारांचा वारसा लाभलेले छत्रपती, पण भविष्य कथन...?''; संभाजीराजेंना 'या' नेत्याचा चिमटा

मागील अनेक दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट २०१९ मध्ये जिंकलेल्या लोकसभा जागांवर निवडणूक लढवणाण्यावर ठाम आहे. त्याच अनुषंगाने ठाकरे गट मतदारसंघांचा आढावा घेत आहे. त्यामुळे १९ जागांवर मागणी करून शिवसेना ठाकरे गटाने एक पाऊल पुढे टाकले आहे. २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप व शिवसेना युती होती. यावेळी भाजपने २५ तर व शिवसेनेकडून २३ जागा लढवल्या होत्या. शिवसेनेने तब्बल १८ जागांवर विजय मिळवला होता.

Uddhav Thackeray On Loksabha
Ahmednagar Politics : 'नगर दक्षिण'च्या जागेवर शरद पवारांची राष्ट्रवादी लावणार ताकद; कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश!

राज्यात आगामी निवडणुका शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व काँग्रेस असे तीनही पक्ष आघाडीत एकत्रित निवडणुका लढणार आहेत. यामुळे जागावाटपांवर तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवसेनेत घडलेल्या फुटीनंतर ठाकरे गटाचे १३ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात गेले, परिणामी ठाकरे गटाच्या खासदारांची संख्या कमी झाली. यामुळे ठाकरे गटाच्या जागांच्या मागणीवरून तडजोड होईल की, मागील निवडणुकीत जिंकलेल्या जागा ठाकरेंना मिळतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com