Uddhav Thackeray : मुंबईचा एक जण मंत्री झाला असून त्याने कहरच केला. आजच्या गद्दारीची तुलना त्यांनी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेशी केली. छत्रपती शिवाजी महाराज कुठं, आग्रा कुठं आणि महाराज सुटताना त्यांना भाजपनं मदत केली होती? जशी या गद्दारांना भाजपने केली. ही गद्दारी आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजप नेते व मंत्री मंगलप्रताप लोढांच्या वक्तव्यावर घणाघाती टीका केली आहे.
वांद्रे येथील लहुजी साळवे यांच्या जयंती महोत्सवात उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजसुध्दा त्यांना जुना आदर्श वाटायला लागू आहेत. यात मुंबईचा एक जण मंत्री झाला असून त्याने कहरच केला. आजच्या गद्दारीची तुलना त्यांनी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेशी केली. छत्रपतींनी आग्र्याहून सुटका झाल्यानंतर स्वराज्य स्थापन केलं. त्यांनी जर स्वराज्य स्थापन केलं नसतं तर आताचे तुलना करणारे कुठेतरी कुर्निसात करत बसले असते असा निशाणा देखील ठाकरे यांनी शिंदे गटावर साधला. (Uddhav Thackeray's criticism on the Shinde group)
यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, मी हळूहळू बाहेर पडतोय. आपलं सरकार असताना दोन वर्षे करोना काळात गेली. त्यानंतर माझी शस्त्रक्रिया झाल्याने सहा महिने गेले. यामुळे मला घराबाहेर पडता येत नव्हतं. मी घराबाहेर पडत नसल्याने हा घराबाहेर पडत नाही अशी टीका करण्यात येत होती. आता घराबाहेर पडायला लागलो तर त्यांच्या पोटात गोळा यायला लागला असा टोलाही ठाकरेंनी यावेळी लगावला.
शिवशक्ती, भिमशक्ती आणि लहुशक्ती एकवटली तर प्रचंड मोठी ताकद फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशात उभी राहील. मुंबईत तुमची लोकसंख्या अडीच-तीन लाख असेल ठीक आहे. संख्या किती महत्त्वाची हे निवडणुकीच्या वेळेला ठरतं. पण एखादा लढा उभा राहतो तेव्हा ढिगभर गद्दार सोबत असण्यापेक्षा मूठभर मर्द सोबत असणं गरजेचं आहे. तो अनुभव मी आता घेतोय असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.