Ajit Pawar News : सीमावादावर अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारला महत्वपूर्ण सल्ला ; म्हणाले...

Ajit Pawar : सीमावादावर कर्नाटकच्यावतीने अॅड.मुकुल रोहतगीसारखे वकील उभे राहणार असतील तर...
Ajit Pawar Eknath Shinde-Devendra Fadnavis
Ajit Pawar Eknath Shinde-Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar Latest News: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमावर्ती भागातील गावांवर केलेल्या दाव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. तसेच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये देखील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी देखील झडत आहे. याचदरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निर्माण झालेल्या सीमावादावर मोठं विधान करत शिंदे फडणवीस सरकारला मोलाचा सल्ला सुध्दा दिला आहे.

Ajit Pawar Eknath Shinde-Devendra Fadnavis
शिंदे-फडणवीस सरकारला मोठा झटका? मुंबई महापालिका प्रभागरचनेवर न्यायालयाचे आदेश...

अजित पवार म्हणाले, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर अक्कलकोट यांच्यासह सांगली जिल्हयातील जत तालुक्यातील गावांबाबत कारण नसताना चर्चा उपस्थित केली. आणि त्यामुळे सर्वांचं लक्ष तिकडे वळलं गेले. आता बोम्मई हे दिल्लीत गेले असून तिथे त्यांनी अॅड.मुकुल रोहतगी म्हणून जे प्रख्यात वकील आहे त्यांची भेट घेतली असून त्यांची सीमावादावर कर्नाटक सरकारची सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी नियुक्ती केली आहे.

आता याबाबत मी देखील काही माहिती घेतली. त्यात मधल्या काळात माझं शंभूराज देसाई यांच्याशी देखील माझं बोलणं झाले. ते त्यांच्या परीने प्रयत्न करताहेत. पण माझं असं स्पष्ट मत आहे की, विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना आपल्या बाजूने न्यायालयात केस लढविण्याचं काम हरिश साळवे यांनी केलं आहे.

Ajit Pawar Eknath Shinde-Devendra Fadnavis
Anil Sole: माजी आमदार अनिल सोलेंना मिळालेले पुरस्कार भंगारात; ५०, १०० रुपयांत विक्री..

आता सीमावादावर कर्नाटक सरकारच्यावतीने बाजू मांडण्यासाठी अॅड.मुकुल रोहतगीसारखे वकील उभे राहणार असतील तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सीमाप्रश्नाबाबत काम पाहणाऱ्या चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई यांनी लवकरात लवकर महाराष्ट्राची बाजू मांडण्यासाठी हरिश साळवी यांची नियुक्ती करायला हवी असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत.

कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी काही दिवसांपूर्वीच दिल्लीत अॅड.मुकुल रोहतगी यांची भेट घेतली होती. या भेटीत त्य़ांनी रोहतगी यांच्यासोबत महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर चर्चा केली. आता सीमाप्रश्नावर कर्नाटकच्या वतीने ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी हे सुप्रीम कोर्टात युक्तिवाद करणार आहेत.

कोणाचं सरकार रडकं आणि कोणाचं दमदार हे सर्वांना माहितीय...

मागचं सरकार रडणारं सरकार होतं, आत्ताचं सरकार दमदार असून दमदार कामगिरी करतंय या भाजपच्या टीकेवर बोलताना अजित पवार म्हणाले, उध्दव ठाकरे आणि आम्ही कुणी रडणारे होतो असं कधी दिसलं का, उलट आमचे आवाज एेकलं तरी निम्मे अर्धे लोक घाबरतात,. उगीच तसे प्रश्न निर्माण केले जातात. कोण रडतंय, कोण रुसतंय हे लोकांना सगळं कळतंय असं देखील पवारांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com