Uddhav Thackrey : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचे उत्साही स्वागत; शिवसैनिकांनी केली मोठी गर्दी...

Political News : खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभेत ठाकरेंचा दौरा
Uddhav Thackrey
Uddhav ThackreySarkarnama
Published on
Updated on

Dombvili News : शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा कल्याण व परिसरातील सहा विधानसभा मतदारसंघांना भेट दिली. या दौऱ्यात ठाकरे गटाला कार्यकर्ते जमवणेदेखील अवघड असल्याचे बोलले जात होते. प्रत्यक्षात मात्र एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला प्रचंड गर्दी झाली होती. ठिकठिकाणी कार्यकर्ते मोठ्या संख्येने दिसून येत होते.

गद्दारांना गाडा, निवडणुकीत कचऱ्याच्या डब्यात टाका,अशी शेलकी टीका त्यांनी यावेळी शिंदे यांच्यावर केली. उद्धव ठाकरे प्रथम शिळफाटा येताच त्यांचे जंगी स्वागत झाले. त्यानंतर देसाई शाखा येथे त्यांनी भाषण केले. या भाषणातदेखील त्यांनी मी घराणेशाहीवर घाव घालायला आलो आहे, असे वक्तव्य त्यांनी केले.

Uddhav Thackrey
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार साताऱ्यातील कातकरी समाजाशी संवाद...

येणाऱ्या निवडणुकीत या मतदारसंघात मी स्वतः जातीने लक्ष घालणार आहे, असे त्यांनी सांगितले. एकंदरीतच कल्याण लोकसभा निवडणूक निष्ठेची ठरणार असल्याचे संकेतच त्यांनी दिले. उद्या संक्रांत आहे. त्यामुळे सध्या तिळगुळ घ्या गोड बोला, असे सुरू आहे. या लोकशाहीच्या निवडणुकीत हुकूमशाहीवर संक्रांत येणार हे नक्की.

गद्दारांच्या घराणेशाहीचं तिकीट मोदीच कापतील

सीताराम भोईर (Sitaram Bhoier) यांच्यासारखे निष्ठावान शिवसैनिक असल्याने कल्याणमध्ये काय होणार, याची मला चिंता नाही. घराणेशाहीला विरोध असेल तर गद्दारांच्या घराणेशाहीचं तिकीट मोदीच कापतील. वापरा आणि फेका हे भाजपचे धोरण आहे. त्यामध्ये हे गद्दार उद्या कचऱ्याच्या टोपलीत जाणार आणि नाही गेले तर शिवसैनिक आहेतच. अनेक महिन्यांपासून मला कल्याण येथे भेट द्यायची होती. त्यामुळे मी येथे आलो, असे त्यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी देसाई शाखेचे उद्घाटन त्यांनी केले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांच्या सभेला कार्यकर्ते नसतील, अशी टीका विरोधक करीत होते. मात्र प्रत्यक्षात ते ज्या ठिकाणी भेट देत आहेत, त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे आम्हाला कार्यकर्ते जमविण्याची गरज नाही. आमच्याकडे निष्ठावान शिवसैनिक आहेत, अशी कुजबुज कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती.

(Edited by Sachin Waghmare)

R...

Uddhav Thackrey
Uddhav Thackrey: लांबलेल्या महापालिका निवडणुकीचा ठाकरे गटाला धोका

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com