Jitendra Awhad On Shivsena: शिंदेंच्या ठाण्यात ठाकरेंची ताकद वाढवण्याचा जितेंद्र आव्हाडांचा इरादा

Jitendra awhad and Uddhav Thackeray: "शरद पवारांचा निष्ठावान कार्यकर्ता असलो तरी मी ठाण्यात ठाकरेंच्या पाठीशी उभा राहणार"
Jitendra awhad and Uddhav Thackeray
Jitendra awhad and Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Thane News: ठाणे महापालिकेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा पक्का इरादा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. आव्हाडांच्या या इराद्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवसेना (ठाकरे गट) खासदार राजन विचारे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आव्हाड बोलत होते.

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांना अजून जवळपास एक वर्षाचा कालावधी बाकी आहे. मात्र, आतापासूनच राजकीय नेत्यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यास सुरवात केली आहे. आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिकांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचाच झेंडा फडकवू, असा विश्वासही आव्हाडांनी यावेळी व्यक्त केला.

Jitendra awhad and Uddhav Thackeray
Narendra Modi Vs INDIA : 'इंडिया'च्या रणनीतीला पंतप्रधान मोदींचे तोडीस तोड उत्तर; पाठोपाठ बैठकांचा धडाका

"माझी विचारसरणी काँग्रेसची असली तरी आणि शरद पवारांचा निष्ठावान कार्यकर्ता असलो तरी मी ठाण्यात ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे", असे सूतोवाचही आव्हाडांनी केले. "महाराष्ट्राच्या भूमितून पुन्हा एकदा क्रांती घडेल आणि ठाणे महापालिकेवर ठाकरेंचा भगवा पुन्हा एकदा फडकवेल", असा पक्का इरादाच आव्हाडांनी बोलून दाखवला.

Jitendra awhad and Uddhav Thackeray
Monsoon Session News : शहांनी विरोधकांना ठणकावले : दिल्ली सेवा विधेयकावरून लोकसभेत गोंधळ

खासदार राजन विचारे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी जितेंद्र आव्हाड आणि ठाणे काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण यांनी काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात हजेरी लावली होती. याचवेळी महाविकास आघाडीच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शनही करण्यात आले.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com