Shiv Sena : सत्तार, गुलाबरावांना हाकला, नाहीतर सरकारची चौथी घंटा वाजायला लागेल !

Shiv Sena : अब्दुल्लाने आपल्या तोंडाचे गटार असे उघडले की, त्यातून फक्त दुर्गंधीच बाहेर पडली.
Abdul Sattar
Abdul Sattarsarkarnama

Abdul Sattar : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या टीकेचा (Abdul Sattar Abused Supriya Sule) समाचार शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून आज घेण्यात आला आहे. पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्यावरही शिवसेनेनं निशाणा साधला आहे. (Abdul Sattar latest news)

"अब्दुल सत्तार यांच्या एका गलिच्छ, बेशरम वक्तव्यामुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना या अब्दुल्लाने आपल्या तोंडाचे गटार असे उघडले की, त्यातून फक्त दुर्गंधीच बाहेर पडली," अशा शब्दात सत्तार यांना शिवसेनेनं सुनावलं आहे.

"अब्दुल सत्तार हा काही महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा समाजकारणात दखल घ्यावी असा माणूस नाही. मराठवाड्यातील सिल्लोडचा हा बेडूक इकडून तिकडे सोयीनुसार उड्या मारतो. सोयीनुसार डराव डरावही करतो. त्याच्या तोंडातून नेहमीच गटाराचा मैला वाहत असतो. महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरेस ते शोभणारे नाही," असे अग्रलेखात म्हटलं आहे.

शिंदे-फडणवीस सरकार म्हणजे महाराष्ट्राच्या माथी दिल्लीने मारलेला महादळभद्री प्रयोग, सत्तारांना बेडकाची उपमा...तर गुलाबराव पाटलांचा खोकेबाज 'टाईट'असा उल्लेख करण्यात आला आहे. "अब्दुल सत्तार, गुलाब पाटलांसारख्या मंडळींच्या झोकांड्या जाताना पाहून महाराष्ट्राची सुसंस्कृत जनता जोडेफेक करू लागली आहे. हा महाराष्ट्राच्या माथी दिल्लीने मारलेला महादळभद्री प्रयोग आहे. या मंत्र्यांना हाकला, नाहीतर सरकारची चौथी घंटा वाजायला लागेल," असा इशारा शिवसेनेनं दिला आहे.

Abdul Sattar
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : द्वादशीवार अध्यक्ष नको म्हणून मंत्रालयातून खरंच फोन आला ?

सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे..

अब्दुल सत्तार हे मिंधे गटाचे जाणते सरदार असून त्यांच्या अंगावर मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या कृषी मंत्रीपदाची झुल टाकली आहे. सध्या अतिवृष्टीमुळे राज्यात शेतीची अवस्था दारुण आहे. अशा वेळी ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी हा माणूस आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे अशांवर बेताल वक्तव्य करीत सुटला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com