Ujjwal Nikam News : शरद पवारांनी मला ऑफर दिली होती, 40 मिनिटांच्या चर्चेत... ; निकमांनी केला खुलासा!

Lok Sabha Election 2024 : पवार साहेंबाचा हेतू प्रामाणिक होता. मी म्हणालो, विचार करु सांगतो," असा खुलासा उज्ज्वल निकम यांनी केला.
Ujjwal Nikam News
Ujjwal Nikam News Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभेसाठी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना भाजपने मुंबई उत्तर मध्यमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. यानंतर आता त्यांचा राजकारणात अधिकृत प्रवेश झाला आहे. मात्र पाच पर्षांपूर्वी निकम यांना तेव्हाच्या एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी राजकीय ऑफर दिली होती, असा खुलासा त्यांनी केला. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली आहे. (Latets Marathi News)

उज्वल निकम म्हणाले, "पाच वर्षांपूर्वी मला राजकारणाची ऑफरच होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावे मला ऑफर दिली होती. शरद पवार (Sharad Pawar) साहेबांनी मला सांगितलं होतं. त्यांनी चाळीस मिनिटे माझ्याशी चर्चा केली. तुम्ही राजकारणात उभे राहा. वयाचा विचार करता तुम्ही दहा वर्ष राजकारणात पाहिजे. पवार साहेंबाचा हेतू प्रामाणिक होता. मी म्हणालो, विचार करु सांगतो," असा खुलासा उज्ज्वल निकम यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ujjwal Nikam News
Kiran Mane Post : उज्ज्वल निकम यांना लोकसभेत नव्हे जेलमध्ये पाठवायला हवं! मुश्रीफांचा हवाला देत मानेंचा ‘घाव’
Ujjwal Nikam News
Solapur NCP : लोकसभा निवडणुकीतून पवारांच्या राष्ट्रवादीची विधानसभेची तयारी; बडे नेते लावले गळाला

राजकारणापलीकडचे सलोख्याचे संबंध -

राजकीय पक्षांच्या पलीकडे माझे सर्वांशी चांगले आणि सलोख्याचे संबंध आहेत. कुणाशी व्यक्तिगत शत्रुत्व असण्याचं कारण नाही . मी कधीही कोणत्याही राजकीय नेत्याला याची बदली करा, त्याची बदली करा, असे सांगितले नाही. पण एखाद्या पोलिस (Police) कर्मचाऱ्याने चांगलं काम केलं तर त्याला प्रशस्तिपत्रक द्यायला सांगितलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com