Sanjay Gaikwad : ठाकरेंना कळलंय, आपला 'निकाल' लागलाय : गायकवाडांनी देशमुखांना खडसावले...

Shivsena MLA Disqualification Case: त्यामुळे हे असे अकलेचे तारे तोडत आहेत...
MLA Sanjay Gaikwad
MLA Sanjay GaikwadSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना सोळा आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लागण्यापूर्वीच शिंदे आणि ठाकरे गटातील आमदारांमध्ये जुंपली आहे. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी अजब मागणी केल्याने वाद निर्माण झाला आहे. यावर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी पलटवार केला आहे. "आता ठाकरे गटाला कळून चुकले आहे, की आपला निकाल लागलेला आहे, त्यामुळे हे असे अकलेचे तारे तोडत आहेत," असे गायकवाड म्हणाले.

दोन्ही गटाकडील आमदारांनी निर्णय आमच्याच बाजूने लागणार, असा विश्वास व्यक्त केला आहे. शिंदे गटातील आक्रमक आमदार संतोष बांगर यांनी निकालापूर्वीच वादग्रस्त विधान केलं आहे. "निकाल आमच्याच बाजूने लागणार,' असे म्हणत निकाल लागल्यावर गुपचूप बसा नाहीतर पोलिस रट्टे देतील, असे विधान केलं आहे.

MLA Sanjay Gaikwad
Santosh Bangar: गुपचूप बसा नाहीतर पोलिस रट्टे देतील! निकालापूर्वीच शिंदेंच्या आमदाराचं वादग्रस्त विधान...

शिवसेना आमच्याकडे आहे, तिकडे (ठाकरे गट) उरलेली सेना आहे. ती सेना सोनिया गांधी आणि राहुल गांधींची शिवसेना आहे. आक्रमक शिवसैनिक आमच्याकडे आहेत. त्यामुळे कुणी काहीही सांगत असतील, पण आमचे पोलिस सक्षम आहेत. त्यांना रट्टे देऊन शांत करतील, निकाल लागल्यावर गुपचूप गप्प बसा नाहीतर रट्टे देऊन ते मोकळे होतील," असे बांगर म्हणाले.

"शिवसेनेच्याच बाजूनं निकाल लागणार, यात कुठलेच दुमत नाही," असा ठाम विश्वास बांगर यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी निकाल आमच्याच बाजूने लागणार आणि जल्लोष आम्हीच करणार, असा विश्वास व्यक्त केला. विरोधकांकडून कितीही प्रचार करण्यात आला तरी त्यांचा आसुरी आनंद आहे , कितीही देव पाण्यात ठेवले तरी निर्णय आमच्याच बाजूने लागणार आणि जल्लोषदेखील आम्हीच करणार, असा टोला त्यांनी विरोधकाना लगावला.

R...

MLA Sanjay Gaikwad
Satej Patil News: विधानसभा अध्यक्षांनी 'ती' गोष्ट टाळायला हवी होती...!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com