Akshay Shinde Encounter Case : उल्हासनगरमध्ये तणाव! अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराला विरोध

Opposed to burying Akshay shinde dead body : शांतीनगर स्मशानभूमी बाहेर मोठ्या प्रमाणात लोक जमले होते. त्यांनी अक्षयच्या दफनविधी करण्यास विरोध केला. पोलिसांनी काही लोकांना ताब्यात देखील घेतले आहे.
Opposed to burying Akshay shinde dead body
Opposed to burying Akshay shinde dead bodysarkarnama
Published on
Updated on

Akshay Shinde Encounter Case : दोन लहान मुलींवर अत्याचार प्रकरणात अटक असलेल्या आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर पोलिसांनी केला होता. आज (रविवारी) उल्हानसगरमधील शांतीनगर स्मशानभूमीत अक्षयचा दफणविधी करण्यात येणार होता. मात्र, इथल्या स्थानिकांनी अक्षयचा दफनविधी शांतीनगर स्मशानभूमीत करण्यास विरोध केला. त्यामुळे पोलिस आणि स्थानिकांमध्ये तणाव निर्माण झाला होता. पोलिसांमध्ये आणि स्मशानभूमीच्या बाहेर आंदोलन करणाऱ्यांमध्ये झटापट देखील झाली.

अक्षय शिंदेंचा सात दिवसांपूर्वी एन्काऊंटर पोलिसांनी केला होता. मात्र, या प्रकरणात अक्षयचे आई वडील कोर्टात गेले होते. भविष्यात पुन्हा अक्षयच्या मृतदेहाची तपासणी करावनी लागेल त्यामुळे त्यांचा मृतदेह न जाळता दफण करण्याच्या निर्णय घेण्यात आला होता.

Opposed to burying Akshay shinde dead body
Phulambri Assembly Constituency 2024 : भाजपला सत्ताधारी शिवसेनेकडूनच धोका, तर काँग्रेसच्या जागेवर राष्ट्रवादीचा डोळा

अक्षयचा मृतदेहाच्या दफन करण्यासाठी बदलापूर आणि इतर स्मशानभूमीमध्ये विरोध केला जात होता. त्यामुळे पोलिसांकडून स्मशानभूमीचा शोध घेण्यात येत होता. उल्हासनगरमधील शांतीनगर स्मशानभूमीत अक्षयचा मृतदेह दफण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, ही माहीत मिळताच मोठ्या संख्येने नागरिक शांतीनगर स्मशानभूमीच्या बाहेर जमले होते. त्यांनी अक्षयचा दफनभूमी येथे करण्यास विरोध केला.

पोलिसांमध्ये आणि स्थानिकांमध्ये तणावाचे वातवरण निर्माण झाले होते. पोलिसांनी स्मशानबाहेर असलेल्या सर्वांना तेथून जाण्याची आव्हान करत जाण्याचे आव्हान केले.

Opposed to burying Akshay shinde dead body
Mahayuti News: CM शिंदेंचा फडणवीसांना धक्का; जिल्हासचिवासह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com