Anmol Bishnoi : अनमोल बिष्णोई भारताच्या ताब्यात; बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणाच्या तपासाला वेग येणार

Anmol Bishnoi Handed Over to India: Boost in Baba Siddique Murder & Salman Khan Firing Probe : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि अभिनेता सलमान खान याच्या निवासस्थानी केलेल्या गोळीबार प्रकरणात अनमोल प्रमुख आरोपी आहे.
Anmol Bishnoi
Anmol BishnoiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai crime news : अंडरवर्ल्ड डॉन लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोई याला अमेरिकेने भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या हवाली केले आहे. त्याला आज भारतात आणण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि अभिनेता सलमान खान याच्या निवासस्थानी केलेल्या गोळीबार प्रकरणात अनमोल प्रमुख आरोपी आहे. या दोन्ही घटनांच्या तपासाला आता वेग येऊ शकतो.

प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मंगळवारी अमेरिकेने अनमोल यास भारतीय यंत्रणांच्या हवाली केले. भारतीय पथकाने मंगळवारी सायंकाळी अनमोलला ताब्यात घेऊन भारताच्या दिशेने प्रवास सुरू केला. बुधवारी सकाळी हे पथक दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरेल, अशी माहिती मुंबई (Mumbai) पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

बाबा सिद्दीकी हत्या आणि अभिनेता सलमान खान (Salman Khan) गोळीबारप्रकरणी गुन्हे शाखेने त्याच्या प्रत्यार्पणासाठी केंद्रीय गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून अमेरिकेकडे दोन प्रस्ताव पाठवले होते. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मकोकानुसार गुन्हा नोंदवून गुन्हे शाखेने दाखल केलेल्या आरोपपत्रात अनमोलसह दोन आरोपी ‘वाँटेड’ होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांनी अनमोल याला कॅलिफोर्नियात अटक केली होती.

Anmol Bishnoi
Ganesh Naik Janata Darbar Petition : गणेश नाईकांचा जनता दरबार; न्यायालयाचा सल्ला एकनाथ शिंदेंची शिवसेना ऐकणार का?

महाराष्ट्रासह देशभरात गुन्हे नोंद असलेल्या अनमोलचा ताबा प्रथम कोणत्या तपास यंत्रणेकडे सोपवावा याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालय घेईल, अशी प्रतिक्रिया मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. अनमोलचा ताबा सर्वप्रथम मिळावा यासाठी गुन्हे शाखेचे प्रयत्न सुरू असल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. सूत्रांच्या माहितीनुसार दिल्ली, पंजाब, हरियाना इथल्या नोंद गुन्ह्यांचा तपास पूर्ण केल्यानंतर अनमोलचा ताबा मुंबई गुन्हे शाखेला दिला जाणार आहे.

Anmol Bishnoi
Raj Thackeray News: राज ठाकरेंनी खडसावलेल्या 'मुळशी पॅटर्न' फेम अभिनेत्याचा पंधरा दिवसांच्या आतच मोठा निर्णय, मनसेला धक्का

बाबा सिद्दीकी हत्याप्रकरण

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईतील नेते बाबा सिद्दीकी यांची 10 आॅक्टोबर 2024 रोजी रेकी करून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी चार जणांना सुपारी देण्यात आली होती. विशेष म्हणजे हे आरोपी पंजाबच्या एका जेलमध्ये होते. तिथेच त्याचा संपर्क बिष्णोई गँग बरोबर आल्याचे पोलिस तपासात समोर आलं आहे. या हत्येसाठी 2 लाखांची सुपारी देण्यात आली होती. या हत्येत असलेल्या प्रत्येकाला त्यातून 50,000 हजार रूपये मिळणार होते.

सलमान घराबाहेर गोळीबारप्रकरण

14 एप्रिल 2024 मध्ये सलमान खान याच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार करण्यात आला. प्रकरणातील आरोपी आणि लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित मोहम्मद रफिक सरदार चौधरी याला अटक केली. गोळीबारापूर्वी घटनेच्या दोन दिवस आधी मोहम्मद रफिक चौधरी सलमान खानच्या वांद्रे इथल्या गॅलेक्सी अपार्टमेंट्सबाहेर दिसला होता. त्याने एक रेकी व्हिडिओ शूट केला होता आणि तो लॉरेन्स बिष्णोईचा धाकटा भाऊ अनमोल बिष्णोईला पाठवल्याचे तपासात समोर आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com