Amit Shah News : भाजपचे 'मिशन 45' : मुंबई दौऱ्यात अमित शाहंकडून होणार झाडाझडती

BJP News : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित शाह भाजप नेत्यांना नव्या टिप देणार?
Amit Shah
Amit Shah Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : आगामी विधानसभा, लोकसभा आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष कामालाही लागले आहेत.

आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे १६ एप्रिलला मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते या दौऱ्यादरम्यान निवडणुकांच्या तयारीसाठी विशेष बैठक घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, आगामी लोकसभेच्या निवडणुका, मुंबई महापालिका याबबात अमित शाह हे मुंबईत रणनीती आखणार असल्याचंही बोललं जात आहे. शनिवारी (ता.१५) अमित शाह यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथिगृहात एक महत्वाची बैठकही पार पडणार आहे. या बैठकीत अमित शाह भाजपच्या कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Amit Shah
Chandrakant Patil : चंद्रकांतदादांच पदवी प्रमाणपत्र नियमांनुसारच; मुंबई विद्यापीठाचे स्पष्टीकरण

रविवारी (ता.१६) नवी मुंबईत शाह यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर ते पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याचे समजते. यावेळी विशेषतः आगामी लोकसभा निवडणूक आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेऊन, या निवडणुकांत ताकद लावून जिंकण्यासाठी काही नव्या टिपही शाह भाजप नेत्यांना देण्याची शक्यता आहे.

Amit Shah
PMC Employee Transfer : पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागात वर्षानुवर्षे मुक्काम ठोकलेल्या अधिकाऱ्यांची आता होणार का बदली?

दरम्यान, मुंबई महापालिका आणि मुंबई लोकसभेच्या साऱ्या जागा ताब्यात घेण्यासाठी शाह अधिक लक्ष घालणार असल्याचेही दिसून येत आहे. या बैठकीत भाजप नेत्यांसोबत नवा मित्रपक्ष शिवसेना (शिंदे गट) नेत्यांनाही बोलावले जाऊ शकते. मात्र, शिवसेनेच्या मोजक्याच तेही स्वतंत्रपणे चर्चा होण्याचा अंदाज आहे.

(Edited By Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com