Chandrakant Patil : चंद्रकांतदादांच पदवी प्रमाणपत्र नियमांनुसारच; मुंबई विद्यापीठाचे स्पष्टीकरण

Mumbai University : मुंबई विद्यापीठाने काय स्पष्टीकरण दिले?
Chandrakant Patil
Chandrakant Patil Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून आपल्या हरवलेल्या पदवी प्रमाणपत्राची प्रत मुंबई विद्यापीठातून एका दिवसात मिळवली, असा आरोप युवा सेनेने (ठाकरे गट) केला आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या या पदवी प्रमाणपत्रावरून युवासेना चांगलीच आक्रमक झाली. विद्यापीठात पदवी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अनेकवेळा जावं लागतं. त्यानंतर प्रमाणपत्र मिळतं. मग चंद्रकांत पाटलांना एका दिवसांत ते कसं मिळालं?, असा सवाल युवासेनेने केला होता.

Chandrakant Patil
N V Ramana : ठाकरे-शिंदे संघर्षांची सुनावणी करणाऱ्या सरन्यायाधीशांचा असा ही एक विक्रम !

त्यानंतर मुंबई विद्यापीठाने याबाबत सर्व गोष्टी तपासून स्पष्टीकरण देण्यात येईल, असं सांगितलं होतं. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई विद्यापीठाने चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या हरवलेल्या पदवी प्रमाणपत्राच्या प्रतीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

विद्यापीठाने काय स्पष्टीकरण दिले?

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबई विद्यापीठाच्या सिद्धार्थ महाविद्यालयातून एप्रिल १९८० साली बीकॉमची पदवी संपादन केली. त्यांची मूळ पदवी गहाळ झाल्यामुळे त्यांनी पदवी प्रमाणपत्राची नक्कल प्रत (Duplicate) प्राप्त करण्यासाठी विद्यापीठाकडे अर्ज केल्यानंतर विद्यापीठाने नियमानुसार सर्व प्रक्रिया करून त्यांना दुय्यम पदवी दिली.

Chandrakant Patil
Karnataka Assembly Election : कर्नाटकातील विजयासाठी काँग्रेसला महाराष्ट्रातून मोठी 'रसद'!

सदरची पदवी जुनी असल्याने ती मॅन्युअली असते. ती बाहेर प्रिंटिंग साठी पाठविली जात नाही. ती विद्यापीठ स्तरावर तयार केली जाते. या जुन्या पदवीचे फॉरमॅट तयार असतात. यावर विद्यार्थ्यांचा तपशील हस्ताक्षराने लिहिला जातो. यामुळे ही पदवी एका दिवसात तयार होते.

अशा प्रकारे यापूर्वी काही विद्यार्थ्यांना कमी वेळात पदवी प्रमाणपत्र दिली आहेत. या पदवीसाठी चंद्रकांत पाटील यांच्याकडून किंवा त्यांच्या कार्यालयाकडून कोणताही दबाव आलेला नाही, असे स्पष्टीकरण मुंबई विद्यापीठाने दिले आहे.

(Edited By Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com