Kapil Patil: गायकवाड, शिंदे समर्थकांमधील वादावर कपिल पाटील म्हणाले,'आमच्यात मतभेद आहेत, पण..

Kalyan Politics : कल्याण पूर्वेतील शिवसेना शिंदे गट भाजपा वादावर कपिल पाटील यांनी पडदा टाकला आहे.
Kapil Patil
Kapil PatilSarkarnama

Kalyan : भाजपचे आमदार गणपत गायकवाड आणि खासदार श्रीकांत शिंदे समर्थकांमध्ये कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात काही दिवसांपासून वाद सुरु आहे. गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. केंद्रीय मंत्री कपिल पाटलांनी यावर प्रतिक्रिया देत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

गणपत पाटील आणि शिंदे गटातील वाद एकमेकांची उणीदुणी काढण्यापर्यंत पोहोचला आहे. "आमच्या लोकांमध्ये मतभेद असले तरी मनभेदांमध्ये त्यांचं परिवर्तन होणार नाही,"असे सांगत कल्याण पूर्वेतील शिवसेना शिंदे गट भाजपा वादावर कपिल पाटील यांनी पडदा टाकला आहे.

Kapil Patil
BJP News: भाजप महावितरणच्या कार्यालयात 'फटाके फोडणार';"हिंदूंच्या सणातच, असे प्रकार का होतात?

भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी अप्रत्यक्षरित्या शिवसेना शिंदे गटावर नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत बोलताना कपिल पाटील यांनी याबाबत आमदार गणपत गायकवाड आणि महापालिका आयुक्त दोघांशी बोलणार आहे. आम्ही सरकारमध्ये एकत्र आहोत. समन्वय असणे गरजेचे आहे. काही वैयक्तिक वाद असेल तर ते बाजूला ठेवावेत. आमच्या लोकांमध्ये मतभेद असले तरी मनभेदांमध्ये त्यांचं परिवर्तन होणार नाही ते पुन्हा एकत्र जोमाने कामाने लागतील," असा विश्वास कपिल पाटलांनी व्यक्त केला आहे.

ठाणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान झाले आहे. "अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मी स्वतः सुद्धा शेतकरी आहे. माझ्या देखील पिकाचं नुकसान झाले आहे. सरकार संवेदनशील आहे, मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्या, अशी मागणी कपिल पाटलांनी केली.

Kapil Patil
Lalit Patil Case: दर महिन्याला ललितकडून ससूनला १७ लाख रुपये...; धंगेकर म्हणाले,...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com