Urfi Javed- Chitra Wagh Dispute : 'संजय आठवतो का...?' उर्फीने चित्रा वाघांच्या जखमेवर मीठ चोळले...

चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद चं थोबाड फोडण्याचा इशारा दिला होता.
Urfi Javed News :
Urfi Javed News :

Urfi Javed News : भाजप (BJP) महिला नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यातील वाद दिवसेंदिवस चिघळत चालल्याचे दिसत आहे. उर्फीच्या सोशल मिडीयावरील अंग प्रदर्शनाच्या विरोधात वाघ यांनी थेट पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तर उर्फीने देखील चित्रा वाघ यांना सोशल मीडियावर प्रत्युत्तर दिले. आता या दोघींमध्ये ट्विटर वॉर सुरु झाले आहे. चित्रा वाघ यांनी थोबाड फोडण्याचे वक्तव्य केल्यानंतर उर्फीने थेट विद्यमान मंत्री संजय राठोड प्रकरणाची आठवण करुन देत वाघ यांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे.

Urfi Javed News :
Ashish Shelar: '' महाराष्ट्राच्या इतिहासाशी फितुरी करणारा व्यक्ती...''; आशिष शेलारांचा राऊतांवर हल्लाबोल

चित्रा वाघ यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे उर्फी जावेदबद्दल तक्रार दाखल केली. उर्फीच्या कपड्यांवरुन टीका करत 'उर्फी जावेदरुपी स्त्री देहाचा बाजार रोखा' अशी मागणी करत वाघांनी उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केली. इतकेच नव्हे तर उर्फी जावेद भेटली तर तिच्या थोबाडात लगावेल, असंही वाघ यांनी म्हटलं. आता वाघ यांच्या या वक्तव्यानंतर उर्फीनेही त्यांच्यावर पलटवार केला आहे.

उर्फीने नुकतच एक ट्विट करत चित्रा वाघ यांना संजय राठोड प्रकरणाची आठवण करून दिली आहे. उर्फी ट्विट करत म्हणाली, ' मी भाजपमध्ये प्रवेश केल्यास चित्रा वाघ यांच्याशी मैत्री व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. चित्राजी तुम्हाला संजय राठोड आठवतात का. संजय राठोड शिवसेनेत असताना ज्या प्रकारे तुम्ही त्यांच्यावर हल्ला केला, पण त्यांनी भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर मात्र तुम्ही त्यांच्या सर्व चुका विसरलात?" असे ट्विट करत उर्फीने वाघ यांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. आता उर्फी जावेदच्या या ट्विटवर वाघ काय उत्तर देतात, हे पाहाणे महत्त्वाचे ठरणा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com