Belapur Constituency Election 2024: 'बेलापूर'मध्ये भाजपच्या आजी-माजी आमदारामध्ये रस्सीखेच; कोण बाजी मारणार?

BJP Belapur Constituency Manda Mhatre Vs Sandeep Naik: नाईक यांनी म्हात्रे यांच्या मतदारसंघात कामाला सुरवात केली आहे. कोपरखैरणेतून मतदान करणाऱ्या नाईकांनी लोकसभेत बेलापूर मतदारसंघात आपले नाव नोंदवून मतदान केले.
Sandeep Naik Vs Manda Mhatre
Sandeep Naik Vs Manda Mhatre Sarkarnama

Navi Mumbai News : लोकसभेनंतर विधानसभेत आपले अस्तित्व टिकविण्यासाठी नवी मुंबईतील सर्वच पक्षांचे नेते कामाला लागले आहेत. बेलापूर मतदार संघात भाजपच्या दोन नेत्यामध्ये रस्सीखेच सुरु आहे. बेलापूर मीच लढणार, असा दावा आजी-माजी आमदारांनी केला आहे.

भाजप आमदार मंदा म्हात्रे या बेलापूरच्या विद्यमान आमदार आहेत. या मतदारसंघावर माजी आमदार, भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी दावा ठोकला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संदीप नाईक इच्छुक आहेत.

Sandeep Naik Vs Manda Mhatre
Mumbai Teachers Constituency Election : मुंबईतील अभ्यंकरांच्या उमेदवारीला 'आदर्श'वरून डिवचलं; शिंदे गटानं ठाकरेंना खिंडीत गाठलं

मंदा म्हात्रे यांच्या बालेकिल्ल्यात संदीप नाईक यांनी आपलं जनसंपर्क कार्यालय थाटलं आहे. सीबीडी सेक्टर 15 येथे आपल्या भाजप कार्यालयाचे उद्धघाटन करूननाईक यांनी बेलापूर विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे.

भाजपाकडून मंदा म्हात्रे बेलापूर विधानसभेत आमदार असतानाही संदीप नाईक यांनी म्हात्रे यांच्या मतदारसंघात कामाला सुरवात केली आहे. प्रत्येक निवडणूकीत कोपरखैरणेतून मतदान करणाऱ्या संदीप नाईकांनी या लोकसभेत बेलापूर मतदारसंघात आपले नाव नोंदवून मतदान केले.

मंदा म्हात्रे-संदीप नाईक यांच्यातील रस्सीखेच पाहता विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीतील नेत्यांच्या आवाहनापेक्षा महायुतीमधील नेत्यांनीच एकमेकांसमोर आव्हान उभे केल्याचे दिसते.

मंदा म्हात्रे यांचे तिकीट कापून संदीप नाईक यांना भाजप पक्षश्रेष्ठी उमेदवारी देणार का? असा प्रश्न सध्या विचारण्यात येत आहे. भाजप पक्षश्रेष्ठी कुणाच्या पारड्यात झुकत माप टाकणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

संदीप नाईक यांनी सीबीडी येथे मतदान करून आपण बेलापूर विधानसभेतून इच्छूक असल्याचे संकेत दिले होते.महायुतीतचे तिकिट मिळविण्यात कोण बाजी मारतोय… कोण पक्ष बदलतोय कि अपक्ष उभा राहतो, का नवी मुंबईतही सांगली पॅटर्न घडवतोय. हे येत्या काही दिवसातच समजेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com