कल्याण आणि ठाणे लोकसभेच्या जागेवरून शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याणमधून पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांची उमेवारी जाहीर केली. श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर (Vaishali Darekar) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
महायुतीमध्ये कल्याण लोकसभेची जागा कुणाला मिळणार याकडे गेल्या काही दिवसांपासून सर्वांचं लक्ष (Kalyan Lok Sabha Constituency) होतं. कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी मिळणार, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होते.
उद्धव ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर (Kalyan Lok Sabha) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरेकर यांनी कल्याणची जागेवरुन भाजपवर टीका केली आहे. "कीव येते ...करा ना जाहीर, करा ना जाहीर बोलत फडणवीसांनी एकदाचं केलं जाहीर.हि नामुष्की असल्याचं दरेकरांनी म्हणाल्या.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांची घोषणा झाल्यानंतर काल (शनिवारी) त्यांनी उल्हासनगरमध्ये येऊन काँग्रेस कार्यालय मारळगाव तसेच शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यावेळी त्या माध्यमांशी बोलत होत्या. कल्याणची जागा शिवसेनेला सोडल्यामुळे ठाण्याच्या जागेवर भाजपचा दावा मजबूत झाल्याच्या चर्चा आहे, तर आपल्या बालेकिल्ल्यातील ठाणे जागेवर मुख्यमंत्र्यांचा अजूनही दावा कायम असल्याचा सांगण्यात येते.
श्रीकांत शिंदे यांचे नाव जाहीर करणे ही औपचारिकता होती, कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी मिळणे ही काळ्या दगडावरची रेष होती, मात्र कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत होता म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांचे उमेदवारी जाहीर केल्याचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले.
शनिवारी भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे समर्थकांनी घेतलेल्या बैठकीत कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळावा, अशी मागणी करत श्रीकांत शिंदे यांचे काम करणार नसल्याचा इशारा दिला होता .याबाबत कपिल पाटील यांनी बैठकीस उपस्थित असलेल्या आमदार गायकवाड यांच्या समर्थकांसह भाजप कार्यकर्त्यांच्या कान टोचले.
बैठकीबाबत बोलताना केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी ,नेमकं काय झालं हे माहित नाही, याचे पूर्ण माहिती घेतल्याशिवाय बोलणं उचित ठरणार नाही. मात्र एकदा आपल्या नेत्याने युती केल्यानंतर पक्षात असलेल्या लोकांनी कार्यकर्त्यांनी नेत्यांनी अशा प्रकारची भूमिका घेणे उचित नाही. आपल्या काही भावना असतील तर आपल्या नेत्यांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत, असे पाटील यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.