Kalyan Lok Sabha constituency : कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांचा प्रचार करणार नसल्याची जाहीर भूमिका भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांनी घेतली. त्यामुळे भाजपची कोंडी झाली. मात्र, गायकवाड यांच्या समर्थकांनी घोषणा करून 24 तास होत नाही तोच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली. तसेच भाजप श्रीकांत शिंदेंच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे गणपत गायकवाड काय भूमिका घेणार, याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागेल आहे.
गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात श्रीकांत शिंदेंशी ( Srikant Shinde )जवळीक असलेले शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरणी गणपत गायकवाड तुरुंगात आहेत, पण त्यांच्या समर्थक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात श्रीकांत शिंदे यांचा प्रचार करणार नसल्याचा ठराव शुक्रवारी मंजूर केला. मात्र, आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devndra Fadnavis) यांनी थेट श्रीकांत शिंदेच्या पाठीशी भाजप उभी राहणार असल्याचे जाहीर करून गणपत गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांची कोंडी केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गणपत गायकवाड तुरुंगात असल्याने फडणवीसांच्या घोषणेनंतर गायकवाड यांचे समर्थक संभ्रमावस्थेत आहेत. शिवसेनेच्या (शिंदे गट) जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात अपप्रचार करून गणपत गायकवाड यांना जामीन मिळेल, या भ्रमात राहू नका, असा थेट इशाराच गणपत गायकवाड यांच्या समर्थकांना दिला.
श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी घोषित केल्याने गणपत गायकवाड यांचे समर्थक युती धर्म पाळणार का? याची चर्चा सुरू आहे. श्रीकांत शिंदेंना विरोध असूनही देवेंद्र फडणवीस गणपत गायकवाड यांची समजूत काढणार का? हे थोड्याच दिवसांत स्पष्ट होईल. गायकवाड आपल्या समर्थकांना जो आदेश देतील, त्याप्रमाणे ते काम करतील, अशी चर्चा आहे.
दरम्यान, कल्याण आणि ठाणे जागेवरून शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच असल्याची चर्च होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी कल्याणमधून मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे यांची उमेवारी जाहीर केली. त्यामुळे ठाण्याच्या जागेवर भाजपचा दावा मजबूत झाल्याच्या चर्चा आहेत, तर आपल्या बालेकिल्ल्यातील ठाणे जागेवर मुख्यमंत्र्यांचा अजूनही दावा कायम असल्याचा सांगण्यात येत आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.