Prakash Ambedkar: महाविकास आघाडीचं घ्यायचं ठरलं, पण आंबेडकरांचं जायचं काही ठरेना; आता ठेवली 'ही' मोठी अट

Vanchit Bahujan Aaghadi : ॲड.प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीकडे मोठी अट ठेवली.
Mahavikas Aghadi :
Mahavikas Aghadi : Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत स्थान देण्यात आले. याबाबतचे पत्रही महाविकास आघाडीकडून जारी करण्यात आले. यामुळे वंचित बहुजन आघाडी यापुढे महाविकास आघाडीचा भाग असणार हे स्पष्ट झाले. मात्र आता ॲड.प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीकडे मोठी अट ठेवत तब्बल 25 मुद्दे आघाडीला देत या 25 मुद्यांवर आघाडीतील पक्षांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. तसेच 'वंचित'च्या आघाडीतील समावेशाबाबतही आंबेडकरांनी मोठं भाष्य केलं आहे. (Vanchit Bahujan Aaghadi )

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस या तीनही पक्षांसमोर मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, दिल्लीतील शेतकरी आंदोलनासह तीन शेतकरी कायद्यावरील स्थगिती, असे तब्बल 25 मुद्दे आणि किमान समान कार्यक्रमावर आघाडीतील पक्षांनी भूमिका स्पष्ट करावी, असं ॲड.प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mahavikas Aghadi :
Mahavikas Aghadi : हुश्श...! अखेर महाविकास आघाडीने 'वंचित'साठी दार उघडले

2 फेब्रुवारीच्या बैठकीपर्यंत जागा वाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट करण्याचा आग्रह आम्ही केला आहे. आम्ही आमचा इगो आडवा येऊ देणार नाही. मात्र, आम्हाला जे पत्र देण्यात आले, त्यावर नाना पटोले यांची सही आहे. यावर आघाडीत बोलणी करण्याचे अधिकार अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांना असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. पण त्या दोघांपैकी कुणाचीही सही नाही. त्यामुळे अजूनतरी 'वंचित'चा आघाडीत समावेश झाल्याचं मानायला मी तयार नाही, असं आंबेडकर म्हणाले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाच्या चर्चेबाबत आंबेडकर म्हणाले, "काल झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीचं काही ठरले नसल्याचे लक्षात आले. त्यांचे ठरावे म्हणून आम्ही आमचे काही मुद्दे त्यांच्या समोर ठेवले आहेत. याबरोबरच बैठकीत जागा वाटपासंदर्भात काय ठरलं ? याची माहिती आम्ही मागितली असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जागा वाटपाबाबत आम्ही भूमिका घेतली आहे की अडीच वर्षांपासून आपण तिन्ही पक्ष एकत्रित आहात. त्यामुळे तुमच्या जागा वाटपाची माहिती आम्हाला द्यावी, अशी मागणी आम्ही केली म्हणजे आम्हाला आमची भूमिका घेता येईल, असं मतही ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.

(Edited By-Ganesh Thombare)

Mahavikas Aghadi :
Lok Sabha Election 2024 : मातब्बरांना लोकसभेपेक्षा विधानसभेचे टेन्शन; आघाडीच्या नेत्यांना राजकीय भविष्याची चिंता

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com