Mahavikas Aghadi : हुश्श...! अखेर महाविकास आघाडीने 'वंचित'साठी दार उघडले

Vanchit Bahujan Aaghadi : वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश, महाविकास आघाडीकडून पत्र जारी
Mahavikas Aghadi
Mahavikas AghadiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : गेल्या अनेक दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेण्यासंदर्भात चर्चा सुरु होत्या. अखेर मंगळवारी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत स्थान देण्यात आले. यासंदर्भातील पत्र महाविकास आघाडीकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. (Vanchit Bahujan Aaghadi)

महाविकास आघाडीकडून पत्र प्रसिद्ध करण्यात आल्यामुळे आता या पुढे वंचित बहुजन आघाडी महाविकास अघाडीचा भाग असणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची 2 फेब्रुवारीला महत्वाची बैठक असणार आहे. या बैठकीला ॲड. प्रकाश आंबेडकर देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीने प्रसिद्ध केलेल्या पत्रामध्ये महाविकास आघाडीतील पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस यांच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत स्थान देण्याबाबत एकमत झालं. त्यानंतर पत्राद्वारे यासंदर्भातील माहिती देण्यात आली. दरम्यान, महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीला स्थान देण्यात आल्यानंतर ॲड. प्रकाश आंबेडकर काय प्रतिक्रिया देतात, ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

संजय राऊतांचं ट्विट काय ?

"वंचित बहुजन आघाडीचा आज महविकास आघाडीत समावेश झाला. ॲड.बाळासाहेब आंबेडकर हे 2 फेब्रुवारीला महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभागी होतील. 'वंचित'मुळे देशातील हुकूशाही विरोधी लढ्याला नक्कीच बळ मिळेल. भारताचे संविधान धोक्यात आहे. एकत्र येऊन संविधान वाचवावे लागेल", असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

महविकास आघाडीत 'वंचित'ची एन्ट्री

गेल्या काही महिन्यांपासून वंचित बहुजन आघाडी महविकास आघाडीत येण्यासंदर्भात इच्छुक होती. याबाबत अनेकदा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांवर अनेकवेळा बोलून दाखवलं होतं. मात्र यानंतरही महाविकास आघाडीतील पक्षामध्ये एकमत होत नसल्याने 'वंचित'ची महाविकास आघाडीत एन्ट्री होत नव्हती. मात्र, अखेर वंचित बहुजन आघाडीसाठी बंद असलेले महविकास आघाडीचे दार खुले झाले असून यापुढे 'वंचित' महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) एक भाग असणार आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

Mahavikas Aghadi
NCP Hearing : शरद पवारांकडून दुसऱ्या चिन्हाची चाचपणी? राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीवरून चर्चेला उधाण!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com