Domnic Ghonsalves Died : वसईचे माजी आमदार डॉमनिक घोन्सालविस यांचे निधन

Vasai Political News : सुरुवातीच्या काळात ठाणे पंचायत समिती सदस्य, तर 1985 ते 1990 या कालावधीत वसई मतदारसंघाचे आमदार म्हणून ठसा उमटविला. आमदारकीच्या काळात विधानसभेत मुख्य प्रतोद म्हणून काम केले.
Domnic Ghonsalves
Domnic GhonsalvesSarkarnama
Published on
Updated on

Tane News : वसईचे माजी आमदार, विधानसभेचे प्रतोद आणि सहकार क्षेत्रातील अग्रगण्य नाव असलेल्या डॉमनिक घोन्साल्विस (वय 93) Domnic Ghonsalves यांचे रविवारी (ता. 7) निधन झाले. त्यांच्या मागे अॅलन, रोहन, युरी अशी तीन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

बीए पदवी घेतल्यानंतर घोन्साल्विस यांनी काही काळ शासकीय मध्यवर्ती प्रेसमध्ये काम केले होते. समाजवादी विचारसणीमध्ये वाढलेल्या घोन्साल्विस यांनी जनता दलाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला होता.

त्यांनी सुरुवातीच्या काळात ठाणे Thane पंचायत समिती सदस्य, तर 1985 ते 1990 या कालावधीत वसई मतदारसंघाचे आमदार म्हणून ठसा उमटविला. आमदारकीच्या काळात विधानसभेत मुख्य प्रतोद म्हणून काम केले. 1990 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा हितेंद्र ठाकूर यांच्याकडून पराभव झाला.

सहकार क्षेत्रातही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उठविला होता. बंगली सोसायटीचे संस्थापक संचालक, बँसीन कॅथॉलिक बँकेचे सचालक, खरेदी-विक्री संघाचे संस्थापक अध्यक्ष, पान मार्केटिंग सोसायटीचे चेअरमन (1967 ते 2006), कार्डिनल ग्रेशस हॉस्पिटलचे विश्वस्त, वसई कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष, पिगरी सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष, साधना भांडारचे संस्थापक, साधना सहकारी पतपेढीचे संस्थापक, म. बि. कुलकर्णी ट्रस्टचे अध्यक्ष, पान मार्केटिंग चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष, लोकसेवा मंडळाचे सचिव अशी विविध पदे भूषविली.

Domnic Ghonsalves
Daund Politics : मानेंच्या बदल्यात कटारिया? दौंडमध्ये शरद पवारांची मोठी खेळी

घोन्साल्विस यांच्यावर सोमवारी (ता. 8) सकाळी सांडोर येथील सेंट थॉमस चर्च येथे अंत्यविधी करण्यात येणार आहेत. घोन्साल्विस यांना राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर Hitendra Thakur म्हणाले, सहकार क्षेत्रात कामाचा ठसा उमटविणाऱ्या घोन्साल्विस यांनी अनेक संस्था उभ्या केल्या. राजकारणात काम करताना वडीलकीच्या नात्याने आमच्यावर टीकाही केली, तर चांगल्या कामासाठी पाठिंबाही दिला. ते आमचे मार्गदर्शक होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

(Edited by Sunil Dhumal)

Domnic Ghonsalves
Sangli Lok Sabha Constituency : जागावाटपाचा तेढ वाढला; महाआघाडीला कुणाची 'नौटंकी' पडणार भारी?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com