Vasai-Virar Ward Formation : वसई-विरार महापालिकेच्या प्रभाग रचनेवर आक्षेप, १६० हरकती; काँग्रेसची कोर्टात धाव!

Vasai-Virar Municipal Corporation : वसई विरार महापालिकेची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या प्रभाग रचनेविरोधात काँग्रेसने न्यायालयात धाव घेतली आहे.
Vasai-Virar Municipal Corporation
Vasai-Virar Municipal Corporationsarkarnama
Published on
Updated on

Vasai-Virar Municipal Election : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता प्रारूप प्रभाग रचना २२ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. ही रचना महापालिकेच्या मुख्य कार्यालयात, सर्व प्रभाग समिती कार्यालयांमध्ये तसेच www.vvcmc.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती.

या प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत. पालिकेने यासाठी २२ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर हा कालावधी निश्चित केला होता. या काळात महापालिकेकडे एकूण १६० हरकती व सूचना दाखल झाल्या असून, त्यापैकी १० मूळ हरकतींसह २१३० रहिवाशांनी सामूहिकरीत्या दाखल केलेल्या एका मोठ्या हरकतीचाही समावेश आहे.

राज्य निवडणूक आयोग लवकरच या हरकतींवर सुनावणी घेणार आहे. मात्र दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्षानेही प्रभाग रचनेविरोधात न्यायालयाची दार ठोठावली आहे. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय व आयोगाची सुनावणी या दोन्ही प्रक्रियांकडे नागरिकांसह सर्व राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

Vasai-Virar Municipal Corporation
Manoj Jarange Patil On Dhananjay Munde News : 'धनंजय मुंडेंनी मजा करावी, राजकारण करावं, पण मराठ्यांच्या नादाला लागू नये'!

दरम्यान, न्यायालयाने राज्य सरकारला चार आठवड्यांत निवडणुकीची अधिसूचना काढण्याचे निर्देश दिले होते. मात्र अद्याप ती जाहीर झालेली नाही. या संदर्भात १६ सप्टेंबरला होणाऱ्या सुनावणीत राज्य सरकार काय भूमिका मांडते यावर निवडणुकीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

प्रभाग रचना २०१५

११५ प्रभाग, ११५ नगरसेवक

प्रभाग २०२५

२९ प्रभाग, ११५ नगरसेवक (२८ प्रभाग चार सदस्यीय, तर १ प्रभाग तीन सदस्य)

Vasai-Virar Municipal Corporation
NCP Minister : अजितदादांच्या मंत्र्याबाबत शिवसेना खासदार आक्रमक; ‘तुम्ही आमचा जिल्हा वाऱ्यावर सोडणार आहात का?’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com