मुंबई : शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे (vinayak mete) यांचे आज (रविवारी) पहाटे अपघाती निधन झाले. ते 52 वर्षांचे होते. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील भाताण बोगद्याजवळ त्यांच्या गाडीचा पहाटे 5.20 वा. अपघात झाला.त्यांना पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. (accidental death of mla vinayak mete)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी विनायक मेटेंच्या दुर्दैवी निधनावर शोक व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार म्हणाले, "महाराष्ट्रासाठी ही दुदैवी घटना आहे. मराठा समाजाला न्याय मिळेल,असा त्यांना विश्वास होता.या अपघाताची चौकशी करण्यात येणार आहे,"
"आज आम्ही एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. पण दुर्दैवाने विनायक मेटे .यांच्या दु:खद निधनाचे वृत्त समोर आले. या निधनामुळे विनायक मेटेंच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सरकार त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहे. सकाळी प्रथम हे वृत्त समजले, तेव्हा त्यावर माझा विश्वासच बसला नाही." असे मुख्यमंत्री म्हणाले.
फडणवीस म्हणाले, "आजचा दिवस दुःखद घटनेने सुरु झाला. मेटे हे संघर्षमय व्यक्तीमत्व, नेतृत्व होते. मराठा आरक्षणासाठी त्यांची लढा उभारला. त्यांच्या मोठा अभ्यास मराठा आरक्षणाचा असतो. आजच्या बैठकीबाबत त्यांनी रात्री सव्वादोन वाजता मेसेज पाठवला होता. सामान्यासाठी लढणारा नेता हरपला आहे,"
खासदार सुप्रिया सुळे म्हणाले, "शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष, माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले.ही घटना अतिशय दुःखद आहे.हे दुःख सहन करण्याची शक्ती मेटे परिवाराला मिळावी ही प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली,"
वर्धाचे खासदार रामदास तडस म्हणाले, "शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायकरावजी मेटे यांच्या अचानक दुर्दैवी मृत्युने महाराष्ट्रातील शेतकरी दलित शोषित पीडित व मराठा समाज व शिवसंग्राम पक्षांचे खूप मोठे नुकसान झाले अशा या जनसामान्याच्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली,"
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.