Narendra Modi : मोदींच्या सत्कारावेळी शिंदे-फडणवीसांमध्ये रंगला 'पहले आप'चा खेळ; पाहा व्हिडिओ!

Narendra Modi News : काही क्षणांसाठी शिंदे -फडणवीसांमध्ये रंगलेल्या 'पहले आप-पहले आप'ची चर्चा...
Narendra Modi News : Devendra Fadnavis | Eknath Shinde
Narendra Modi News : Devendra Fadnavis | Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Narendra Modi News : आज मुंबईच्या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आले आहेत. मोदींच्या हस्ते मुंबईतील विविध विकास कामं व लोकार्पण झाले. यानंतर आज मोदी यांची बीकेसी मैदानात मोदी यांची सभा पार पडली. दरम्यान यावेळी सभेच्या मंचावर राजकीय नाट्य पाहायला मिळाले. मोदींचे सत्कार करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मोदींचे सत्कार करणयासाठी 'पहले आप, पहले आप' असा खेळ रंगला.

Narendra Modi News : Devendra Fadnavis | Eknath Shinde
Kasba Assembly By-election : कसब्यातून रासने, घाटे, बीडकरांऐवजी शैलेश टिळक होऊ शकतात उमेदवार

नरेंद्र मोदींचे बीकेसी मैदानावर होणाऱ्या सभेच्या मंचावर आगमन झाले. मंचावर मोदींसह इतर नेतेही विराजमान झाले. या वेळी कार्यक्रमाचया निवेदिकेने मोदींचे स्वागत होईल असे निवेदन केले. यावेळी मोदी सत्कारासाठी उभे राहिले असता, शिंदे यांच्याकडे मोदींना परिधान करण्यासाठी फेटा होता, तर फडणवीस यांच्याकडे शाल होती.

Narendra Modi News : Devendra Fadnavis | Eknath Shinde
Pimpri-Chinchwad News: उमेदवारी वरुन चिंचवड भाजपात दोन गट; अश्विनी जगतापांना उमेदवारी मिळाली तरच काम करणार!

मोदींचा सत्कार करण्यासाठी शिंदे आणि फडणवीस दोघेही एकमेकांना खुणावत होते. आपण पहिल्यांदा मोदींचा सत्कार करा असे शिंदे -फडणवीस एकमेकांना इशारा करून सांगत होते. अखेर शिंदेंनी पहिल्यांदा मोदींना फेटा घालून त्यांचा सत्कार केला तर, त्यानंतर फडणवीसांनी मोदींना शाल घालून सत्कार केला. मात्र यामुळे काही क्षणांसाठी शिंदे -फडणवीसांमध्ये रंगलेल्या 'पहले आप पहले आप'ची आता चर्चा होऊ लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com