Video: मनसे नेत्याच्या मुलाचं 'ड्रंक अँड ड्राईव्ह'! मराठी अभिनेत्रीच्या कारला धडक देत, शिवीगाळ अन् धमकी

Drunk And Drive : मुंबईतील मनसेच्या नेत्याच्या मुलानं दारु पिऊन अर्धनग्न अवस्थेत एका मराठी अभिनेत्रीसोबत हुज्जत घातल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Rahil Jawed Shaikh
Rahil Jawed Shaikh
Published on
Updated on

Drunk And Drive : मुंबईतील मनसेच्या नेत्याच्या मुलानं दारु पिऊन अर्धनग्न अवस्थेत मराठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अभिनेत्रीसोबत हुज्जत घातल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्वतः या अभिनेत्रीनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे या नेत्याच्या मुलानं आपल्या कारला धडक देऊन अपघात घडवून आणल्याचा आरोपही या अभिनेत्रीनं केला आहे. याप्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rahil Jawed Shaikh
Maharashtra Dharm Podcast: 'महाराष्ट्र धर्म' सांगताना मुख्यमंत्री 'समता' सांगणार की 'समरसता'! नव्या पॉडकास्टवरुन काँग्रेसनं फडणवीसांना घेरलं; नेमकं काय म्हटलं?

मनसेचे नेते जावेद शेख यांचा मुलगा राहील जावेद शेख यानं हा प्रताप केला आहे. त्याच्याविरोधात अभिनेत्री राजश्री मोरे हीनं आपल्या ट्विटरवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये राहील जावेद शेख यानं तिच्या कारला धडक दिल्याचं दिसतं आहे. धडक दिल्यानंतर राहील आपल्या कारचा दरवाजा उघडा ठेवून आतमध्ये बसल्याबसल्याच राजीश्री मोरे हीच्याशी भांडताना दिसतो आहे.

धक्कादायक बाब म्हणजे या राहील शेख यानं मद्यपान केल्याचं दिसत असून त्यानं अंगामध्ये शर्टही घातलेला नाही. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर राहीलनं आपण नेत्याचा मुलगा असल्याचं तिला सांगत धमकीही दिल्याचा आरोप राजश्रीनं केला आहे. त्याचबरोबर अंबोली पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रारही दाखल केली, त्यानुसार राहीलवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासही सुरु केला आहे.

दरम्यान, राजश्री मोरे नुकतीच एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली होती, तिनं नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, त्यात त्यांनी स्थानिक मराठी लोकांबाबत वादग्रस्त टिप्पणी केली होती. या व्हिडिओत तिनं महाराष्ट्रात राहणाऱ्या परप्रांतियांवर मराठी लादण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. तसंच स्थानिक मराठी लोकांनी अधिक मेहनत करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे असा खोचक युक्तिवादही केला होता. त्याचबरोबर तिनं असाही दावा केला होता की, जर मुंबईतील स्थलांतरीत लोक शहरातून निघून गेले तर मराठी लोकांची स्थिती खूपच वाईट बनेल.

तिच्या या विधानानंतर वर्सोव्यातील मनसे कार्यकर्त्यांनी राजश्री मोरेविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या विधानावरुन तिच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका व्हायला लागल्यानंतर तिनं जाहीररित्या माफीही मागितली होती, तसंच आपला व्हिडिओ देखील सोशल मीडियावरुन हटवला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com