Chhagan Bhujbal : विधानभवन, लोकसभेतील कार्यलये झाले, आता 'मोतोश्री'वर दावा सांगणार का; भुजबळांचा सवाल

Maharashtra Politics : राज्यात बांधालाबांध असल्यासारखी भांडणे सुरू असल्याचा आरोप
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भूतकाळात घडलेल्या घटनांमुळे भाजप सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भाजपने ईडीचा धाक दाखवून शिवसेनेच्या काही आमदारांना पळविले. त्यानंतर 'स्क्रीप्ट'नुसार महाविकास आघाडी सरकार पाडले. राज्यात सुरू असलेल्या घटनांबाबत ठाकरेंना माहिती होती. केंद्रीय निवडणुकीच्या निर्णयानंतर शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना बांधालाबांध असल्यासारखे वागत आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांनी राज्यातील सध्यस्थितीबाबत वक्तव्य केले. भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, "आम्हीही शिवसेनेतून बाहेर पडलो. दुसऱ्या पक्षात गेलो. कुणी स्वतःचा पक्ष काढला. मात्र निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना पक्ष, निशाणी नेली. त्यानंतर शिंदेकडून विधानभवन, लोकसभेतील कार्यालये, शाखांवर अधिकार सांगण्यात आला. उद्या बाळासाहेबांची खुर्ची आहे म्हणून 'मातोश्री'वर दावा सांगणार का? त्याची गरज नाही. शिंदेकडून ताबा मिळवणे थांबविले पाहिजे. राज्यात सध्या बांधालाबांध असल्यासारखी भांडणे सुरू आहेत."

Chhagan Bhujbal
Rajan Patil News : गोव्याचे मुख्यमंत्री राजन पाटलांच्या भेटीला : अनगरकरांचे भाजपच्या दिशेने आणखी एक पाऊल

न्यायालयावर विश्वास

निवडणूक आयोगाने (ECI) दिलेला निकाल अनपेक्षित आहे. राज्यातील सर्वांना माहीत आहे की शिवसेना कोणाची आहे? असे म्हणत भुजबळ यांनी न्यायालयावर विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, "आज पक्ष घेऊन गेलात, मात्र लोकांची सहानूभूती ठाकरेंबरोबर आहे. त्यांनी आयोगाच्या निकालाला न्यायालयात आव्हान दिले आहे. आता थोडाफार विश्वास न्यायालयावर विश्वास आहे. (Court) सरन्यायाधीस चंद्रचूडसाहेब यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. त्यांनी लवकर हे प्रकरण संपविले पाहिजे."

Chhagan Bhujbal
Pimpri-Chinchwad : काँग्रेसला मोठा धक्का; पिंपरी-चिंचवड माजी अध्यक्षाचा राजीनामा

...मग लोकशाही संपले

भुजबळ यांनी पुढे बोलताना लोकशाही संपुष्टात येण्याची भीती व्यक्त केली. ते म्हणाले, "भाजप व ठाकरे एकमेकांवर धोका दिल्याचा आरोप करीत आहेत. सध्या मात्र सध्या शिवसेना (Shivsena) संपवायचीच त्या दृष्टीने काम सुरू आहे. महाविकास आघाडी असताना ठाकरेंच्या काही आमदारांना ईडीच्या नोटीसा होत्या. ते तिकडे गेल्यानंतर मात्र सर्व आरोप गायब झाले. काही तसे गेले काही असे गेले. त्यानुसार सरकार पाडण्याची स्क्रीप्ट तयार केली होती. याची कल्पना ठाकरेंना होती. आता स्वायत्त यंत्रणेत गडबड होत असेल तर सुब्रमण्यम स्वामींच्या (Subramnyam Swami) म्हणण्यानुसार लोकशाहीच संपुष्टात येईल."

Chhagan Bhujbal
Election Symbols : निवडणूक आयोगाकडून पक्षचिन्ह मिळण्याची अशी आहे प्रक्रिया

म्हणून ठाकरेंनी भाजपला सोडले

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) संथ आहेत, असे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणालेत. त्यावर भुजबळ म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी राजकारणाचे लहानपणापासून धडे घेतले आहेत. त्यांचा सर्व अभ्यास आहेत. त्यांचा देशातील सर्व पक्षांच्या वरिष्ठांशी संपर्क आहे. त्यामुळे ते ट्रॅपमध्ये अडकतील असे काही नाही. मात्र भाजपबरोबर राहयचं नाही, हे त्यांच्या लक्षात आलं होतं. त्यानंतरच त्यांनी निर्णय घेतला."

Chhagan Bhujbal
Chinchwad By-Election : पंकजा मुंडेंची जादू चिंचवडमध्ये चालणार का ?

यासाठी भुजबळ यांनी पूर्वी घडलेल्या घटनांचा संदर्भ दिला. ते म्हणाले, "केंद्रीय मंडाळात चार खासदार असतानाही काही पक्षांना दोन मंत्रीपदे देण्यात आली. मात्र १८ खासदार असूनही शिवसेनेला डावलेले. शिवसनेच्या पदरात एकच राज्यमंत्रीपद देत होते. त्यामुळे नाराज शिवसेनेने अनिल देसाईंना (Anil Desai) परत बोलावले. केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये मंत्रीपद त्यांनी घेतले नाही. त्या घटनांचा सर्व परिणाम म्हणजे ठाकरे यांनी भाजप सोडली. तो अचनाक निर्णय नाही."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com