Rajan Patil News : गोव्याचे मुख्यमंत्री राजन पाटलांच्या भेटीला : अनगरकरांचे भाजपच्या दिशेने आणखी एक पाऊल

मुख्यमंत्री डॉ. सावंत हे तब्बल एक तास (सकाळी साडेदहा ते साडेअकरा) माजी आमदार पाटील यांच्याकडेच थांबणार आहेत.
Rajan Patil-Pramod Sawant
Rajan Patil-Pramod Sawant Sarkarnama
Published on
Updated on

मोहोळ (जि. सोलापूर) गोव्याचे (Goa) मुख्यमंत्री (Chief Minister) तथा भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते डॉ प्रमोद सावंत (Pramod Sawant) हे बुधवारी (ता. २२ फेब्रुवारी) मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांच्या अनगर येथील वाड्यावर सदिच्छा भेटीसाठी येत आहेत. त्यामुळे माजी आमदार पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे. (Goa Chief Minister Pramod Sawant will visit Rajan Patil's residence in Angar)

मुख्यमंत्री डॉ. सावंत हे तब्बल एक तास सकाळी (साडेदहा ते साडे अकरा) माजी आमदार पाटील यांच्याकडेच थांबणार आहेत. त्यामुळे या एक तासाच्या चर्चेचे गौडबंगाल काय असणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Rajan Patil-Pramod Sawant
Pandharpur News : प्रणिती शिंंदेंनी मतदारसंघापुरते सीमित राहू नये; जिल्हाभर काम करावे : काँग्रेस नेत्याचा सल्ला

दरम्यान मुख्यमंत्री डॉ. सावंत हे माढ्याला जाणार असून, जाता जाता ते आमच्याकडे चहापानासाठी येत आहेत. एवढा मोठा नेता व एका राज्याचा मुख्यमंत्री अनगरमध्ये येत असल्याने राजकारणविरहित पाहुणा या नात्याने त्यांचे आदराथित्य करणे आपले कर्तव्य असल्याचे माजी आमदार पाटील यांनी सांगितले. त्यामुळे अनेकांच्या भुवया पुन्हा उंचावल्या आहेत.

Rajan Patil-Pramod Sawant
Supreme Court Hearing : बहुमत चाचणीपूर्वीच उद्धव ठाकरेंनी राजीनामा का दिला? युक्तीवादात सिब्बलांनी दिले उत्तर...

माजी आमदार पाटील यांनी १५ दिवसांपूर्वीच ‘अनगर आणि दहा गावे पाणीपुरवठा योजना’ व जुना असलेला ‘सीना-भोगावती जोड कालवा’ ही दोन कामे कोण करेल, त्याच्या सोबत मी जाणार असल्याचा गौप्यस्फोट करून त्यानी राज्यात खळबळ उडवून दिली होती. यापूर्वी माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे व माजी आमदार पाटील यांनी साखर कारखान्याच्या कामाचे निमित्त करून दिल्लीवारी करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

Rajan Patil-Pramod Sawant
Supreme Court Hearing : सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड : सरन्यायाधीशांचा सवाल; ठाकरे गटाच्या वकिलांनी सुचविला ‘हा’ तोडगा

पेनूर येथील एका खासगी कार्यक्रमात बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी राजन पाटील यांच्यासारख्या अभ्यासू नेत्याची गरज असल्याने त्यांनी भाजपत यावे, असे थेट आवताण दिले होते. पापरी येथील एका कार्यक्रमात आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मंत्रिपदासाठी आपण वकिली करू, असे विधान खुद्द पाटील यांनी केले होते. त्या वेळीही मोठी खळबळ उडाली होती.

Rajan Patil-Pramod Sawant
Supreme Court Hearing : ठाकरे गटाच्या वकिलाकडून प्रश्नांचा भडिमार; सरन्यायाधीशांची महत्वाची टिप्पणी

दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे मोहोळशी जुने संबंध आहेत. ते स्वतः डॉक्टर आहेत. आमचे अनेक नातेवाईक डॉक्टर असल्याने त्यांचा व मुख्यमंत्री डॉ सावंत यांचा परिचय असल्याने ते येणार आहेत, असेही पाटील यांनी सांगितले. दरम्यान डॉ. सावंत यांचे एक नातेवाईक मोहोळ येथे दहा ते बारा वर्षे राहत होते. उद्योजक (स्व.) बजरंग गुंड यांचे ते चांगले मित्र होते, त्यामुळे त्यांचे मोहोळशी वेगळे नाते असल्याचे उद्योजक वैभव गुंड यांनी सांगितले.

Rajan Patil-Pramod Sawant
Raju Shetti : राजू शेट्टी आक्रमक : स्वाभिमानीचे उद्या राज्यात चक्का जाम आंदोलन

मुख्यमंत्री डॉ सावंत यांचा मित्र परिवार मोहोळ, मोडनिंब येथे असल्याने ते ही भेटण्यासाठी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुख्यमंत्री डॉ सावंत हे तब्बल एक तास माजी आमदार राजन पाटील यांच्याकडे थांबणार आहेत, त्या एक तासात काय चर्चा होणार, याची उत्सुकता सोलापूर जिल्ह्याला लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com