Vidhan Parishad Election 2024 : विधान परिषद निवडणुकीपूर्वी विधिमंडळाच्या कामकाजात सत्ताधारी आणि विरोधक मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेत. याचमागे विधानपरिषद निवडणुकीची गणिते आखली जात आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी मधले प्रमुख नेते एकमेकांच्या संपर्कात असल्याचे दिसते.
नेमकं कोण कोणावर कुरघोडी करतो की, घोडेबाजार रंगतो, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक चुरशीशी होणार, असेच संकेत मिळू लागले आहेत.
विधान परिषद निवडणुकीसाठी 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचे जबाबदारी शरद पवार यांनी घेतली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिलिंद नार्वेकर देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा कॉन्फिडन्स मोठा दिसतोय. याचाच अर्थ सत्ताधारी महायुतीमध्ये 'कुछ तो गडबड होने वाली है', अशा चर्चेला उधाण आले आहे.
शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी महायुती मधील शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांच्या चांगल्या संपर्कात आहेत त्यामुळे मिलिंद नार्वेकर तिथून मोदक खेचून आणणार असे दिसते आहे. मिलिंद नार्वेकर हे शिवसेना शिंदे गटाचे नेते मंत्री उदय सामंत यांच्या संपर्कात आहेत. काँग्रेसने ऐनवेळी प्रज्ञा सातव्या यांना उमेदवारी दिली आहे.
याचाच अर्थ काँग्रेसने त्यांचे विजयाचे गणित जुळवलेले दिसते. सत्ताधारी महायुती काँग्रेसचे मत फुटणार, असे म्हणत असले, तरी तो त्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स आहे, असा दावा आहे, असे महाविकास आघाडीतील काँग्रेस म्हणत आहे. प्रज्ञा सातव यांनी देखील माझ्या उमेदवारी मागे अनेकांचे अदृश्य हात आहेत. त्यामुळे त्या विजयाच्या जवळ असल्याचे मानले जाते.
शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील (Jayant Patil) यांची जबाबदारी शरद पवार यांनी घेतले आहे. शरद पवार यांच्याबरोबरच जयंत पाटील यांनी देखील महायुतीतील भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत.
आज सकाळी विधिमंडळात त्यांनी भाजप नेते मंत्री सुधीर मुनगंटीवार त्यांच्याबरोबर एन्ट्री घेतली त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाविकास आघाडीमधील तिन्ही उमेदवार सेफ दिसत असताना मग विकेट कोणाची जाणार याचीच, चर्चा सध्या विधान भवनातील राजकीय संग्रामात रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.