Anand Paranjape On Shivsena : '...तर कल्याणमध्ये वेगळा निकाल;' परांजपेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच दिली धमकी!

Lok Sabha Election 2024 : "महायुतीचं चांगले वातावरण राहावं, असं वाटत असेल तर आपल्या वाचाळवीर नेत्यांना त्यांनी आवरावं."
Anand Paranjape On Shivsena
Anand Paranjape On ShivsenaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते व माजी आमदार विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करत, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला (अजितदादा गटाला) आव्हान दिले आहे. यामुळे आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला आहे. (Latets Marathi News)

Anand Paranjape On Shivsena
Sachin Ahir News : 'निवडूनच कसा येता म्हणणाऱ्या दादांच्या मांडीवर जाऊन बसले... ; अहिरांनी शिवतारेंना डिवचलं!

विजय शिवतारेंना आवरा नाहीतर कल्याणमध्ये वेगळे चित्र दिसेल. अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी दिली आहे. शिवतारेंच्या वक्तव्याने आता शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात वाद पेटल्याचे पाहायला मिळत आहे. कल्याण लोकसभा जिंकणं सोपं आहे, असं समजू नका, असे परांजपे यांनी शिंदे गटाला इशारा दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Anand Paranjape On Shivsena
Chitra Wagh ON NCP : 'पवारांना या वयातही फिरावे लागते; पुढची फळी कूचकामी...' ; चित्रा वाघांचा निशाणा!

आनंद परांजपे म्हणाले, मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. त्यांनी आपल्या नेत्यांना आवरावं, नाहीतर आम्हीदेखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. कुणाला जर वाटत असेल कल्याण लोकसभा (Lok Sabha) जिकणं सोपं आहे, तर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता वेगळा निर्णय आणि निकाल देऊ शकतो. त्यामुळे महायुतीचं चांगले वातावरण राहावं, असं वाटत असेल तर आपल्या वाचाळवीर नेत्यांना त्यांनी आवरावं."

दरम्यान, विजय शिवतारेंना (Vijay Shivtare) वर्षा बंगल्यावर बोलावून त्यांना समज देणार असल्याचे शिंदे शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले आहे. शिरसाट म्हणाले, "अजितदादा हे मोठे नेते आहेत. शिवतारेंनी अजितदादांची उंची गाठू नये. आपल्या लेव्हलमध्ये राहावं. उद्या त्यांना वर्षावर बोलावून समज देण्यात येईल," असेही शिरसाट म्हणाले.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com