Vijay Wadettiwar On Mahayuti Government : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 1 जून महिन्यापासून राज्यातील मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली होती. मात्र ही घोषणा हवेत जिरली असून विद्यार्थिनींना शिक्षण घेण्यासाठी फी भरावी लागत आहे. याच मुद्द्यावरुन आता विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी युती सरकारवर निशाणा साधला आहे. (Free Education For Girls)
शिक्षणमंत्र्यांनी मुलींना मोफत शिक्षण दिलं जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र आता जून महिना अर्धा उलटला तरी अद्या सरकारी जीआर निघाला नाही, अंमलबजावणी तर दूरची गोष्ट आहे. नुसत्या घोषणा करणे, प्रसिध्दी मिळवणे, कारभार मात्र शून्य,असं महायुती सरकारचं कामकाज असल्याची बोचकरी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.
विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी याबाबत एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. एक्सवरीव पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, "राज्याचे शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी 1 जूनपासून राज्यात मुलींना मोफत शिक्षण दिलं जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र आता जून महिना अर्धा उलटला पण सरकारी जीआर निघाला नाही. अंमलबजावणी तर अजूनही दूरच.
एक राज्य एक गणवेश या योजनेला सर्व स्तरातून विरोध झाला. तरी सरकारने जीआर काढून अंमलबजावणीचे आदेश दिले. आता शाळा (School) सुरू झाल्या तरी विद्यार्थ्यांना गणवेश आले नाही. या घोषणेचा पण फज्जा उडाला. नुसत्या घोषणा करणे, प्रसिध्दी मिळवणे, कारभार मात्र शून्य,असं महायुती सरकारचं कामकाजठ, अशा शब्दात त्यांनी युती सरकारवर टीका केली. त्यामुळे आता राज्य शासन मुलींच्या मोफत शिक्षणासंदर्भातील जीआर कधी काढणार आणि त्याची अंमलबजावणी कधी करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.