Vijay Wadettiwar : UPSC च्या मनोज सोनींचा टायमिंग चुकला; विजय वडेट्टीवारांनी हेरला अन्...

Vijay Wadettiwar demands inquiry into resignation of UPSC chairman : UPSC च्या अध्यक्षपदाचे पाच वर्ष शिल्लक असतानाच मनोज सोनी यांनी अचानक राजीनामा दिला. त्यामुळे मनोज सोनी यांच्या राजीनाम्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : प्रशिक्षणार्थी IPS पूजा खेडकर यांच्या प्रकरणामुळे UPSC च्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत. पूजा खेडकर यांची नियुक्ती रद्द करण्याची कारवाई सुरू असतानाच UPSC चे अध्यक्ष मनोज सोनी यांनी राजीनामा दिला. त्यामुळे सोनी यांच्या राजीनाम्याचे आणि खेडकर प्रकरणाचे काही धागेदोरे आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला.

मनोज सोनी यांच्या राजीनाम्याचे टायमिंग चुकले असतानाच, विधानसभा विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी सत्य बाहेर येण्यासाठी मनोज सोनी यांच्या राजीनाम्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली.

पूजा खेडकर प्रकरणामुळे UPSC च्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलेत. पूजा खेडकर प्रकरण चर्चेत असतानाच UPSC चे अध्यक्ष मनोज सोनी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पाच वर्ष शिल्लक असतानाच मनोज सोनी यांनी अचानक राजीनामा दिला. त्यामुळे मनोज सोनी यांच्या राजीनाम्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस (Congress) नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. याचबरोबर UPSC, नीट घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली.

Vijay Wadettiwar
IAS Pooja Khedkar : IAS पूजा खेडकर यांचे वडील देखील वादग्रस्त; लाचखोरी,भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे दोनदा निलंबित !

मनोज सोनी यांची 2023 मध्ये अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. गुजरात-बडोदामधील विद्यापीठात सगळ्यात तरुण कुलगुरू म्हणून मनोज सोनी यांची नियुक्ती केली होती. तेव्हा देखील त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला, याची आठवण विजय वडेट्टीवार यांनी करून दिली.

राहुल गांधी यांनी भाजप (BJP) संवैधानिक संस्थावर कब्जा करून त्याचे नुकसान करत आहे, हे पूर्वीपासून सांगत आहेत. आता पूजा खेडकर आणि नीट निकालातील घोळ, त्याचे उत्तम उदाहरण आहे, असेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. असे घोळ भाजप सरकारच्या काळात अधिक वेगाने सुरू असून, वर्षानुवर्ष या परीक्षांसाठी मेहनत घेणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांवर हा अन्याय आहे. केंद्रीय संस्थेवर आज प्रश्न उपस्थित होत आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

Vijay Wadettiwar
IAS Pooja Khedkar : IAS पूजा खेडकरांचा पाय आणखी खोलात! पाथर्डी आणि मुंबईच्या घरांवर पोलिसांची छापेमारी

मनोज सोनी यांच्यापूर्वी पी. के. जोशी UPSC च्या अध्यक्षपदी होते. जोशी पूर्वी मध्य प्रदेश लोकसेभा आयोगाचे अध्यक्ष होते. त्यांच्याच काळात व्यापम घोटाळा झाला. त्यानंतर ते UPSC चे अध्यक्ष झाले. त्यानंतर त्यांची नियुक्ती नॅशनल टेक्सिंग एजन्सीवर (NTA) अध्यक्ष म्हणून करण्यात आली. याच एजन्सीमार्फत नीट परीक्षा घेण्यात आली होती. त्यामुळे UPSC आणि नीट घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com