IAS Pooja Khedkar : IAS पूजा खेडकरांचा पाय आणखी खोलात! पाथर्डी आणि मुंबईच्या घरांवर पोलिसांची छापेमारी

Police Raids Manorama Khedkar and Dilip Khedkar : मुळशी तालुक्यातील धडवली गावात खेडकर कुटुंबाने जमीन खरेदी केली होती. या जमीनी शेजारील शेतकऱ्यांची जमीनाचा ताब्या घेण्याचा प्रयत्न मनोरमा खेडकर यांनी केला होता.
IAS Pooja Khedkar
IAS Pooja KhedkarSarkarnama
Published on
Updated on

Pooja Khedkar News : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी संपण्याचे नाव घेत नाही. मुळशीतील शेतकऱ्यांना धमकावल्याच्या प्रकरणात पौड पोलिस ठाण्यात पूजा यांचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

दिलीप आणि मनोरमा यांचा शोध पोलिस घेत आहेत. मात्र, ते सापडत नसल्याने पोलिसांनी पूजा खेडकर यांच्या मुंबईतील घरावर आणि पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील फार्म हाऊसवर छापेमारी केल्याची माहिती आहे.

मुळशी तालुक्यातील धडवली गावात खेडकर कुटुंबाने जमीन खरेदी केली होती. या जमीनी शेजारील शेतकऱ्यांची जमीनाचा ताब्या घेण्याचा प्रयत्न मनोरमा खेडकर यांनी केला होता. त्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी बंदुकीचा धाक दाखवला होता. या प्रकरणात सात जणांच्या विरोधात पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकऱ्याने पौड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीच्या नंतर पोलिस दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांच्याशी संपर्क साधत होते. मात्र त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने पोलिसांनी पुण्यातील त्यांचा बंगला गाठला. पण बंगल्याला कुलूप लावलेले होते. खेडकर कुटुंबाशी संपर्क होत नसल्याने पोलिसांनी त्यांची शोधमोहिम सुरू केली होती.

IAS Pooja Khedkar
Sudhir Mungantivar News: क्रॉस व्होटिंग करणाऱ्या काँग्रेस आमदारांबाबत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांचं मोठं विधान; म्हणाले...

मनोरमा खेडकर यांना नोटीस

मनोरमा खेडकर यांनी शेतकऱ्यांना बंदुकीने धाक दाखवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनोरमा यांना पोलिसांनी बंदुकीच्या लायसन्स विषयी नोटीस बजावली होती. तसेच या नोटीसमध्ये बंदुक परत करण्याचे देखील सांगण्यात आले होते.

तब्बल 11 वेळा परीक्षा

पूजा खेडकर यांचे एक एक कारनामे समोर येत आहेत. युपीएससी परीक्षेसाठी पूजा यांनी सादर केलेले अपंगत्वाचे प्रमाणपत्र खोटे असल्याच्या चर्चा असतानाच नावात बदल करून तब्बल 11 वेळा पूजा यांनी युपीएससीची परीक्षा दिल्याचे समोर आले आहे. पूजा यांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर केले नसते तर त्यांना आयएएस केडर मिळाले नसते, अशी देखील चर्चा आहे.

IAS Pooja Khedkar
Ashadhi Wari 2024 : आषाढी वारीसाठी प्रथमच मंत्र्यांची समन्वय समिती; चंद्रकांत पाटलांसह तिघांचा समावेश...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com