Vikas Mhatre and Shivsena UBT - भाजपला डोंबिवलीत धक्का देणारे विकास म्हात्रे उद्धव ठाकरेंच्या पक्षात जाणार?

Vikas Mhatre and Dipesh Mhatre meeting - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांनी घेतली विकास म्हात्रेंची भेट अन् बंद दाराआड चर्चाही झाली
BJP corporator Vikas Mhatre seen in a meeting with Shiv Sena UBT leader Dipesh Mhatre in Dombivli, hinting at political realignment.
BJP corporator Vikas Mhatre seen in a meeting with Shiv Sena UBT leader Dipesh Mhatre in Dombivli, hinting at political realignment. sarkarnama
Published on
Updated on

Dombivli BJP Corporator Vikas Mhatre can join Shiv Sena UBT - डोंबिवलीमधील भाजपेचे नगरसेवक आणि महापालिकेतील माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी त्यांच्या पत्नी नगरसेविका कविता म्हात्रे यांच्यासह पक्षाला सोडचिठ्ठी दिली. विकास म्हात्रे यांनी आपले राजीनामापत्र भाजपच्या कल्याण जिल्हाध्यक्षांकडे पाठवले आहे.

विकास कामांसाठी निधी उपलब्ध होत नाही, आमदार रविंद्र चव्हाण यांच्याकडून सहकार्य मिळत नाही, असे आरोप करत विकास म्हात्रे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. तर, ज्या पक्षात मान-सन्मान मिळेल त्या पक्षात मी जाणार असल्याचंही विकास म्हात्रे यांनी कालच स्पष्ट केलं होतं. तर ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जातील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती.

यानंतर आज अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांनी विकास म्हात्रे यांची भेट घेतली, शिवाय या दोघांमध्येही बंद दाराआड चर्चा झाली. यानंतर आता विकास म्हात्रे हे उद्धव ठाकरेंचं नेतृत्व स्वीकारणार असल्याच्या चर्चांना अधिकच बळकटी मिळाल्याचं दिसत आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत विकास म्हात्रेंचा प्रवेश होईल, असंही बोललं जात आहे. विशेष म्हणजे काल रात्रीच विकास म्हात्रे यांचे पोलीस संरक्षण काढण्यात आले आहे.

BJP corporator Vikas Mhatre seen in a meeting with Shiv Sena UBT leader Dipesh Mhatre in Dombivli, hinting at political realignment.
BJP Dombivli setback - भाजपला डोंबिवलीत धक्का! ; प्रदेश कार्याध्यक्षांवर 'हा' आरोप करत, दोन नगरसेवकांनी सोडला पक्ष

विकास म्हात्रे हे गेले तीन टर्म नगरसेवक असून भाजपचे गटनेते तसेच स्थायी समिती सभापती देखील राहिले आहेत. मात्र मागील काही काळापासून ते नाराज होते. विकास कामासाठी निधी मिळत नसल्याने विधानसभा निवडणूक दरम्यान त्यांनी आपली नाराजी उघड केली होती. अखेर पक्ष नेतृत्व त्यांना योग्य सहकार्य करत नसल्याचे सांगत गुरुवारी म्हात्रे दाम्पत्यानी पक्षातील पदाचा राजीनामा दिला.

शुक्रवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी भाजपाचे विकास म्हात्रे यांची त्यांच्या राहत्या घरी भेट घेतली. यावेळी त्यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. यावरून विकास म्हात्रे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाणार असल्याची चर्चांना अधिकच जोर आला आहे.

BJP corporator Vikas Mhatre seen in a meeting with Shiv Sena UBT leader Dipesh Mhatre in Dombivli, hinting at political realignment.
Vijay Wadettiwar - हिंदी सक्तीवर वडेट्टीवारांनी दिला इशारा अन् ठाकरे बंधुंचेही केले स्वागत; जाणून घ्या, काय म्हणाले?

याविषयी दीपेश म्हात्रे म्हणाले, त्यांची भेट घेण्याचे वेगळे कारण होते त्यांच्या आईची पहिली पुण्यतिथी असल्यामुळे मी त्यांच्या घरी गेलो होतो. एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणे ही आपली संस्कृती आहे. त्यांचा राजकीय निर्णय लवकरच होईल ही अपेक्षा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com